Mayem Shree Maya Kelbai Kalshotsav suspended Dainik Gomantak
गोवा

Mayem Kelbai Kalshotsav: मयेतील कळसोत्सव निलंबित; भाविकांच्या उत्साहावर विरजण

Mayem Shree Maya Kelbai Kalshotsav suspended: गेल्या काही वर्षांपासून वादाच्या विळख्यात अडकलेला मयेतील श्री माया केळबाय देवस्थानचा कळसोत्सव यंदा निलंबित करण्यात आला.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: गेल्या काही वर्षांपासून वादाच्या विळख्यात अडकलेला मयेतील श्री माया केळबाय देवस्थानचा कळसोत्सव यंदा निलंबित करण्यात आला. विशेष म्हणजे, देवस्थान समिती आणि अन्य गटांमध्ये एकवाक्यता झाल्याने गेल्या वर्षी कळसोत्सव निर्विघ्नपणे साजरा झाला होता.

शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत कळसोत्सव साजरा करण्याबाबत देवस्थान समिती आणि अन्य समाजातील गटांमध्ये एकमत झाले नाही. परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कळसोत्सव निलंबित करण्याचा निर्णय प्रशासने घेतला. तसा आदेशही उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांनी सायंकाळी जारी केला.

कळसोत्सव निलंबित केल्याने या देवस्थानची प्रसिद्ध माल्याची आणि रेड्याची जत्रा अडचणीत आली आहे. मान व अधिकाराच्या मुद्यावरून मयेतील कळसोत्सव मागील काही वर्षांपासून वादाच्या विळख्यात अडकला आहे. तरीदेखील देवस्थान समिती आणि अन्य गटांमध्ये एकवाक्यता झाल्याने गेल्या वर्षी कळसोत्सव निर्विघ्नपणे साजरा झाला होता. त्यामुळे यंदाही कळसोत्सव होणार, अशी भाविकांना आशा होती. मात्र, हा उत्सव निलंबित केल्याने भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. देवीच्या कळसाचे घरोघरी आगमन कधी होणार, या प्रतीक्षेत असलेल्या भाविकांची घोर निराशा झाली आहे.

उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, मामलेदार शैलेंद्र देसाई यांच्यासह अन्य अधिकारी दुपारपासूनच मंदिरात उपस्थित होते. यावेळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला होता. पोलिस उपअधीक्षक श्रीदेवी बी.व्ही. आणि पोलिस निरीक्षक विजय राणे हेही यावेळी उपस्थित होते.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कळसोत्सव व्हावा, यासाठी काल (ता. २०) तीनवेळा प्रशासकीय पातळीवर देवस्थान समिती आणि अन्य गटांची बैठक झाली. या बैठकीस आमदार प्रेमेंद्र शेट हेही उपस्थित होते.

त्यांनीही शिष्टाई करून तोडगा काढण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. देवस्थान समिती, नाईक, कारबोटकर आणि अन्य गटांचे प्रस्ताव एकमेकांना मान्य झाले नव्हते, अशी माहिती उपलब्ध झाली. बैठकीत सुवर्णमध्य निघाला नाही. त्यामुळे यंदा कळसोत्सव अनिश्चिततेच्या सावटाखाली असल्याचे संकेत मिळाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Points Table: राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

Child Summer Care: सावधान! उन्हाचा कडाका वाढतोय; तुमच्या चिमुरड्यांना उष्माघातापासून 'असे' वाचवा

गोव्यातील व्यक्तीकडून बेळगावात चोरी, 24 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; 160 ग्रॅम दागिने ताब्यात

Strait Of Hormuz Tension: "होर्मुज नाकेबंदीजवळ आलात तर समुद्रातच गाडून टाकू!" ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; अमेरिकन नौदलाला 'शूट टू किल'चे आदेश

SCROLL FOR NEXT