Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco: स्मार्ट सिटी, स्मार्ट ॲप! एका क्लिकवर मिळणार शहराची सर्व माहिती, 'चित्रगुप्त टेक्नालॉजी'ने लॉन्च केले खास ॲप

Urban Digital Tech Goa: पावसाळ्यात कोठे पाणी साचले, कोठे वाहतुकीची कोंडी झाली आहे, किती विक्रेत्यांकडे परवाने आहेत, किती नवीन बांधकामे आली आहेत, याबाबत माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

Sameer Amunekar

वास्को: पावसाळ्यात कोठे पाणी साचले, कोठे वाहतुकीची कोंडी झाली आहे, किती विक्रेत्यांकडे परवाने आहेत, किती नवीन बांधकामे आली आहेत, याबाबत माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. यासंबंधी मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीत चित्रगुप्त अर्बन टेक्नालॉजीजच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती माहिती उपस्थितांना दिली. याप्रसंगी उपस्थित असलेल्या काही नगरसेवक, नगरसेविकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

चित्रगुप्त अर्बन टेक्नालॉजी ही डेटा कंपनी आहे. जी शहरी राहणीमान व प्रशासनात क्रांती घडवून आणण्यासाठी डेटा वापरण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे. कंपनी दृष्टी, ऑडिओ, इतर सेन्सर्सद्वारे निरनिराळे भागांचे निरीक्षण करता येते. यासंबंधी नमन पैठणकर यांनी पीपीटीद्वारे सविस्तर माहिती दिली.

यावेळी नगराध्यक्ष गिरिष बोरकर, मुख्याधिकारी सिध्दीविनायक नाईक, नगरसेवक दामोदर कासकर, नारायण बोरकर, नगरसेविका देविका आरोलकर, इतर नगरसेविका तसेच पालिका अधिकारी व इतर उपस्थित होते.

चित्रगुप्त अर्बन टेक्नालॉजीजने तयार केलेल्या अ‍ॅपमुळे कोणती माहिती उपयुक्त माहिती मिळते, तिचे कार्य कसे चालते, त्यामुळे शहर भागातील विविध समस्यांची उकल कशी करता येईल, यासंबंधी त्यांनी माहिती दिली. सदर अ‍ॅपद्वारा विविध डेटा मिळविता येतो.

काही वर्षापूर्वी एखाद्या ठिकाणची घरे कोणत्या पध्दतीची होती. विद्यमान स्थितीत त्यांच्यामध्ये कोणता बदल व कोणते नूतनीकरण करण्यात आले यासंबंधीची माहिती पालिकेला मिळू शकेल.

एखाद्या विक्रेत्याने व्यवसाय सुरु केला, तथापि त्याने योग्य सोपस्कार पार पाडले की नाही, एका दुकानाच्या जागी आणखी किती दुकाने तयार झाली आहे, यासंबंधीची माहिती उपलब्ध होऊ शकेल. कोठे कचरा जमा झाला आहे, याची माहिती पालिकेला मिळणार आहे. त्यामुळे पालिकेला तेथे योग्य ती उपाययोजना करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: घोगळ येथे महिलेचे सुवर्णालंकार लांबविले

पर्रीकरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यायची असेल, तर विकास अडवू नका, त्याला गती द्या! डबल ट्रॅकिंग आणि कोळसा वाद

Missing Police Constable: ..घरच्यांनी सांगितले केरळला गेला! पोलिस कॉन्स्टेबल 2 वर्षे बेपत्ता; मायणा कुडतरीतील शिपायाला बडतर्फीची नोटीस

Goa Cancer Hospital: 'कॅन्‍सर इस्‍पितळ' वर्षभरात कार्यान्‍वित होणार! मंत्री राणेंनी दिली हमी; सामंजस्‍य कराराची प्रक्रियाही सुरू

Goa Crime: 'गोवा, मुंबईत ड्रग्ज वापरले'! रायपूरमधील 2 महिलांची कबुली; इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून टेक्नो पार्ट्यांचे आयोजन

SCROLL FOR NEXT