Goa Kala Academy: कला अकादमीच्या कामात घोटाळा? 90 लाखांच्या कामांत अनेक त्रुटी, 7 कोटींची सुरक्षा ठेव परत न करण्याचा PWDचा निर्णय

Goa Kala Academy Construction Scam: कला अकादमीच्या नाट्यगृहाचे काम केलेल्या टेकटॉन कंपनीने रंगमंच, प्रकाशयोजना आणि साऊंडबाबत केलेल्या कामात ज्या त्रुटी ठेवलेल्या आहेत.
Goa Kala Academy
Goa Kala AcademyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी : कला अकादमीच्या नाट्यगृहाचे काम केलेल्या टेकटॉन कंपनीने रंगमंच, प्रकाशयोजना आणि साऊंडबाबत केलेल्या कामात ज्या त्रुटी ठेवलेल्या आहेत, त्याचा अंदाजे खर्च ९० लाख रुपये इतका असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याने (पीडब्ल्यूडी) प्रथमदर्शनी निश्चित केले आहे. हा खर्च संबंधित कंत्राटदार कंपनीकडून वसूल करण्यासह कंपनीने सरकारकडे सुरक्षा ठेव म्हणून ठेवलेली ७ कोटींची रक्कमही कंपनीला परत न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ‘पीडब्ल्यूडी’चे अभियंता वल्लभ पै यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.

कला अकादमीच्या नूतनीकरण कामात घोटाळा झाल्याचा दावा करीत विरोधकांनी माजी मंत्री तथा कला अकादमीचे माजी अध्यक्ष गोविंद गावडे आणि सरकारवर हल्लाबोल सुरू केल्ल्यानंतर काहीच दिवसांत नाट्यगृहात नाटक सुरू असताना कलाकारांना साऊंड तसेच प्रकाश योजनेचा फटका बसला.

यावरून विरोधक पुन्हा आक्रमक झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ज्येष्ठ नाटककार विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली कृतिदल स्थापन केले होते. या कृतिदलाच्या सल्ल्यानुसार ‘पीडब्ल्यूडी’ने रॉजर ड्रेगो, शीतल तळपदे आणि राजन भिसे यांची सल्लागार समिती स्थापन केली होती. या समितीने नाट्यगृहाची पाहणी करून काही त्रुटी दाखवून दिल्या होत्या.

Goa Kala Academy
Goa Politics: गोव्यातील अनेक नेते दिल्ली दरबारी, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ? 'या' आमदारांचे मंत्रिपद जवळपास निश्‍चित

त्यावेळीच नाट्यगृहातील जी कामे टेकटॉन कंपनीने केली आहेत, त्यात सल्लागारांनी त्रुटी काढल्यास टेकटॉनकडून त्या कामांचा खर्च वसूल करण्यासह ती कामे दुसऱ्या कंपनीकडून करून घेण्याचा निर्णय ‘पीडब्ल्यूडी’ने घेतला होता. तो खर्च सुमारे ९० लाख इतका असून, तो वसूल करण्यासह कंपनीचे सरकारकडे असलेले सुमारे सात कोटी रुपयेही कंपनीला परत न करण्याचा निर्णय खात्याने घेतला असल्याचेही पै यांनी सांगितले.

सल्लगार समिती ७ जुलैला पुन्हा करणार पाहणी

रॉजर ड्रेगो, शीतल तळपदे आणि राजन भिसे यांची सल्लागार समिती येत्या ७ जुलै रोजी नाट्यगृहाची पुन्हा पाहणी करून आणखी त्रुटी शोधणार आहे. त्यानंतर नेमकी माहिती समोर येईल, असेही वल्लभ पै यांनी सांगितले.

Goa Kala Academy
Goa Politics: कोणाला डच्चू? कोणाला लॉटरी? CM सावंत, आरोग्यमंत्री राणे दिल्लीत; मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता

कलात्मक बदल करणार

सल्लागार समितीच्या शिफारशींनुसार पुढील काही महिन्यांत नाट्यगृहातील सर्व कामे पूर्ण केली जाणार आहेत. पुढील काळात नाट्यगृहात सादर होणाऱ्या नाटकांना तसेच इफ्फी काळात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना कोणताही फटका बसू नये, अशा पद्धतीने नाट्यगृहात बदल केले जाणार असल्याचेही पै यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

F N Souza Hanuman Painting
Goa 97 Voters Electoral Roll
Moushumi Chatterjee boyfriend marriage statement
Porvorim Elevated Road Traffic Management
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com