Mayem Dainik Gomantak
गोवा

Mayem Lake: मये तलावाला लवकरच येणार 'अच्छे दिन', जोडरस्त्याच्या कामाचा प्रारंभ; नोव्हेंबरपासून पर्यटनाला चालना

Mayem: जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या आणि गतवैभव हरवलेल्या मये तलावाला आता ‘अच्छे दिन’ येण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या आणि गतवैभव हरवलेल्या मये तलावाला आता ‘अच्छे दिन’ येण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या तलावाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सरकार आग्रही आहे. या तलावावरील बंद सुविधा पूर्ववत सुरू करून येत्या १ नोव्हेंबरपासून पर्यटनाला चालना देण्यात येईल, अशी माहिती आमदार प्रेमेंद्र शेट यांनी दिली.

मये तलावावर स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. पूर्वीच्या कंत्राटदाराला बदलून नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे, असेही शेट यांनी सांगितले. मये तलावाला जोडणाऱ्या देवूस-भटवाडी रस्त्याच्या हॉटमिक्स कामाचा शुभारंभ केल्यानंतर शेट बोलत होते.

सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे सुमारे ६० लाख रुपये खर्च करून हे काम करण्यात येणार आहे. यावेळी मयेचे सरपंच वासुदेव गावकर, उपसरपंच सीमा आरोंदेकर, पंच विद्यानंद करबोटकर, दिलीप शेट, सुवर्णा चोडणकर आणि कृष्णा चोडणकर, भाजपचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष दयानंद कारबोटकर, विश्वास चोडणकर तसेच बांधकाम खात्याचे अभियंता अभिजित शेनॉय आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

गतवैभवाची प्रतीक्षा...

चार वर्षांपूर्वी पर्यटन विकास महामंडळातर्फे सुमारे दहा कोटी खर्चून विकासकाम करून या तलावाला नवी झळाळी देण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु तलावाचे विकासकाम केल्यानंतर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नसल्याने या तलावाला ‘वाईट दिवस’ आलेले आहेत.

मये तलावाची जलसफर घडावी, म्हणून या तलावावर ‘बोटिंग’ सुविधा उपलब्ध करण्यात आली असली तरी ही सुविधा बंदच आहे. त्यामुळे या तलावावर सध्या सामसूम दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

Goa Agriculture: गोव्यात झेंडू शेतीला बहर! 150 हेक्टरवर लागवड, 200 टन उत्पादनाचा अंदाज

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

SCROLL FOR NEXT