Goa AAP Candidates : सासष्टीत 9 मतदारसंघांत ‘आप’ देणार उमेदवार! काँग्रेसचा बालेकिल्ला भेदण्याची तयारी; गोवा फॉरवर्डही रिंगणात

Goa Assembly Elections 2025 : गोव्याच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सासष्टी तालुक्यात येणाऱ्या जिल्हा पंचायतीच्या ९ मतदारसंघात ‘आप’ने आपले उमेदवार उभे करण्याचे निश्चित केले.
AAP
AAPDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्याच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सासष्टी तालुक्यात येणाऱ्या जिल्हा पंचायतीच्या ९ मतदारसंघात ‘आप’ने आपले उमेदवार उभे करण्याचे निश्चित केले असून या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला शह देण्याची तयारी ठेवली आहे. सासष्टीला आजपर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला असे मानले जात असून ही ओळख पुसण्यासाठी ‘आप’ने सर्व तयारी केली आहे.

सासष्टी तालुक्यात नुवे, कोलवा, बाणावली, वेळ्‍ळी, कुडतरी, दवर्ली, नावेली, राय आणि गिरदोली असे ९ मतदारसंघ आहेत. गेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत बाणावलीतून ‘आप’चा उमेदवार जिंकून आला होता.

यावेळी आम्हाला सासष्टी तालुक्यातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे असून आमची त्या दृष्टीने तयारी चालू आहे, अशी माहिती ‘आप’चे कार्यकारी अध्यक्ष जर्सन गोम्स यांनी दिली.

गोम्स म्हणाले, कित्येक इच्छुक उमेदवार आमच्या संपर्कात आहेत. आमचे उमेदवार जवळ जवळ निश्चित झाले आहेत. आम्ही फक्त कुठले मतदारसंघ राखीव असतील हे पाहत आहोत. एकदा ही माहिती जाहीर झाल्यावर आम्ही आमचे उमेदवार जाहीर करू, असे त्यांनी सांगितले.

AAP
Goa AAP: अरविंद केजरीवाल गोव्यात असतानाच 'आप'ला मोठा फटका; बाणावलीतील दोन मोठ्या नेत्यांसह समर्थकांचा राजीनामा

सध्या बाणावली मतदारसंघात जोसेफ पिमेंता हे ‘आप’चे जिल्हा पंचायत सदस्य असून त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. हा मतदारसंघ महिला किंवा एसटीसाठी राखीव नसल्यास पिमेंता पुन्हा एकदा निवडणूक लढवतील,असे गोम्स म्हणाले.

AAP
Goa Politics: ‘माझे घर’ हा सरकारचा निवडणूक स्टंट, लोकांची फसवणूक करण्याचे षडयंत्र! अमित पाटकरांचे टीकास्त्र

गोवा फॉरवर्डही उमेदवार उभे करणार!

गोवा फॉरवर्ड पक्षानेही यावेळी जिल्‍हा पंचायत निवडणूक गांभीर्याने घेण्‍याचे ठरविले असून नावेली, कुडतरी, बाणावली, नुवे आणि दवर्ली या पाच मतदारसंघात त्‍यांचे उमेदवार उभे राहू शकतात. त्‍याशिवाय काणकोण तालुक्‍यातील दोन्‍ही मतदारसंघात गोवा फॉरवर्ड आपले उमेदवार उभे करणार अशी भूमिका विजय सरदेसाई यांनी स्‍पष्‍ट केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com