
पेडणे: पेडणे पोलिसांनी महाखजान-धारगळ परिसरात पहाटे केलेल्या गस्ती दरम्यान नायजेरियन नागरिकाकडून अंमली पदार्थ जप्त करण्याची मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी युगोच्यू कवू सोलोमन उबाबूको (वय ४३) या नायजेरियन व्यक्तीकडून ३ ग्रॅम एक्स्टसी आणि ६१ ग्रॅम गांजा असा एकूण सुमारे ६४ ग्रॅम अमली पदार्थ हस्तगत केला. तसेच या गुन्ह्यात वापरलेली त्याची स्कूटरही जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालताना संशयास्पद हालचाली दिसताच करण्यात आली. आरोपीला थांबवून झडती घेतली असता त्याच्याकडे एक्स्टसी आणि गांजा आढळला. यापूर्वीही त्याला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक झाल्याची नोंद आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
ही कारवाई पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, प्रवीण सिमेपुरुषकर, कॉन्स्टेबल कृष्णा वेळीप, सचिन हळर्णकर, सागर खोरजुवेकर, ऋषिकेश पार्सेकर, महादेव केरकर, रूपेश शिवजी आणि शशांक साखळकर यांनी केली.
पेडणे पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून या आरोपीच्या पूर्वीच्या गुन्ह्यांची आणि अमली पदार्थ पुरवठा साखळीशी असलेल्या संबंधांची चौकशी केली जात आहे.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधात सुरू असलेल्या पोलिसांच्या मोहिमेचा एक भाग असल्याचे सांगण्यात आले. राज्यात अमली पदार्थांचा प्रसार रोखण्यासाठी अशा कारवाया पोलिसांकडून सुरू आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.