Mayem Kalsotsav Dainik Gomantak
गोवा

Mayem Kalsotsav: अखेर न्यायालयाच्या निर्देशानुसार मयेत कळसोत्सव साजरा, गावातील केळबाय आणि सातेरी मंदिरामध्ये नेला देवीचा कलश

Mayem Kalsotsav 2026 Celebration: न्यायालयाच्या निर्देशानंतर मयेतील स्थगित केलेला श्री माया केळबाय देवस्थानचा कळसोत्सव अखेर रविवारी पोलिस बंदोबस्तात साजरा करण्यात आला.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: न्यायालयाच्या निर्देशानंतर मयेतील स्थगित केलेला श्री माया केळबाय देवस्थानचा कळसोत्सव अखेर रविवारी पोलिस बंदोबस्तात साजरा करण्यात आला.

रविवारी सायंकाळी गावकरवाडा येथील श्री महामाया मंदिरात कलश फुलांनी सजविल्यानंतर त्याची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. नंतर वाजतगाजत देवीचा कलश मंदिराबाहेर काढला. कळसोत्सव साजरा करण्यास आजचा एकच दिवस मिळाल्याने देवीचा कलश फक्त गावातील मंदिरांमध्ये नेण्यात आला.

न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे हा उत्सव सुरळीतपणे साजरा होण्यासाठी गावात कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता. डिचोलीचे उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, मामलेदार शैलेंद्र देसाई, पोलिस अधीक्षक विश्वेश कर्पे, पोलिस उपअधीक्षक श्रीदेवी बी.व्ही. आणि पोलिस निरीक्षक विजय राणे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

मात्र, यंदा निर्बंधामुळे देवीचा कलश भक्तांच्या घरी नेण्यात आला नाही. सातेरी मंदिरात कलश पूजा झाल्यावर भाविकांनी दर्शन आणि कौल घेतला. सायंकाळी कलशाचे पुन्हा श्री महामाया मंदिरात आगमन झाल्यानंतर कळसोत्सवाची सांगता झाली.

न्यायालयाच्या आदेशानुसार उत्सव साजरा

१. २१ फेब्रुवारी रोजी कळसोत्सवास प्रारंभ होणार होता. मात्र, त्यादिवशी कळसोत्सवाबाबत देवस्थान समिती तसेच अन्य समाजातील गटांमध्ये एकमत झाले नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून कळसोत्सव स्थगित करण्याची वेळ प्रशासनावर आली. त्यामुळे कळस मंदिराबाहेर काढला नव्हता.

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध देवस्थान समितीने उत्तर गोवा मुख्य न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कळसोत्सव सुरळीतपणे साजरा करावा, असे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आज कळसोत्सव साजरा करण्यात आला.

एकच दिवस कळसोत्सव

मयेत कळसोत्सव नऊ दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. या नऊ दिवसांत देवीचा कलश पंचक्रोशीतील मंदिरांना भेट देऊन भक्तांच्या भेटीसाठी आणि कौल देण्यासाठी घरोघरी नेण्यात येतो. यावर्षी २१ फेब्रुवारीपासून आजपर्यंत (रविवारी) कळसोत्सव साजरा करण्यात येणार होता. मात्र, सुरुवातीलाच विघ्न उभे राहिल्याने कळसोत्सव स्थगित केला होता. त्यामुळे घरोघरी कलशाचे आगमन कधी होणार, या प्रतीक्षेत असलेल्या भाविकांची घोर निराशा झाली होती.

घरोघरी कळस भेट नाहीच

मान आणि अधिकाराच्या मुद्यावरून गेल्या काही वर्षांपासून मयेतील कळसोत्सव वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. तरीही गेल्या वर्षी कळसोत्सव निर्विघ्नपणे साजरा झाला होता. यंदा कळसोत्सव साजरा झाला, तरी हा उत्सव साजरा करण्यासाठी आज एकाच दिवसाची मुदत होती. त्यामुळे कळस गावातील भक्तांच्या घरी नेणे अशक्य होते. त्यामुळे कळस गावातील श्री केळबाय आणि श्री सातेरी मंदिरात नेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT