Mayem  Dainik Gomantak
गोवा

Mayem News : गावोगावी सण उत्सवांची माहितीपर पुस्तके यावीत : आमदार प्रेमेंद्र शेट

गोमन्तक डिजिटल टीम

Mayem News :

मये वजरी साखळी येथील प्रा. राजेश वजरीकर यांनी लिहिलेल्या ‘श्री लईराई महिमा’ पुस्तकाचे प्रकाशन शिरगाव डिचोली येथील देवस्थान सभागृहात झाले. देवी लईराईच्या महिमेवर आधारित हे पुस्तक संपूर्ण गोमंतकीय जनतेला मार्गदर्शन करणारे आहे.

देवतेची महती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राजेश वजरीकर यांनी केला आहे. गावागावांतील देवतांच्या उत्सवांची माहिती देणारी पुस्तके नव्या पिढीसाठी प्रसिद्ध व्हावीत, ही आजच्या काळाची गरज आहे. असे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.

यावेळी शिरगावच्या सरपंच करिष्मा गावकर, माहिती व प्रसिध्दी खात्याचे अधिकारी श्याम गावकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष गणेश गावकर, प्रा. डॉ. प्रवीण सावंत, प्रा. सोमनाथ पिळगावकर, लेखक राजेश वजरीकर उपस्थित होते.

या मॉडर्न युगात युवा पिढीला आपल्या कुळ व मुळाची जाणीव नसते, त्यांना हे ज्ञान देण्याची जबाबदारी ही पालकांची आहे.

नवीन पिढीतील युवक-युवतींना जत्रोत्सवाची महती माहीत नसते. त्यांना सांगणे ही पालकांचीच जबाबदारी आहे, असे आमदार शेट पुढे म्हणाले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘श्री लईराईचा महिमा’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

पुस्तकांबरोबरच अशी उत्सवासंबंधीची महत्वपूर्ण माहिती ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात उपलब्ध केल्यास ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. त्यासाठी प्रत्येक गावातील जाणकारांनी उत्सवांबाबत नोंद ठेवावी.

-श्याम गावकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

CM Pramod Sawant: राष्ट्रीय प्रवासात 'गोवा' महत्त्वाची भूमिका बजावेल! मुख्यमंत्री सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Sancoale News: क्विनीनगरात तणाव! 'रस्ता' प्रश्नावरून नागरिक आक्रमक'; आमदार वाझ यांची मध्यस्थी

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

SCROLL FOR NEXT