Goa Politics: लोकांचा भाजपविरोधातील राग व्यक्त, दोन्ही जागा जिंकण्याचा इंडिया आघाडी दावा

Goa Politics: गोव्याची ओळख, वारसा आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र काम करेल - अमित पाटकर
Goa INDIA Alliance
Goa INDIA AllianceDainik Gomantak

Goa Politics

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी गोव्यातील दोन्ही जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला असून, राज्याच्या संरक्षणासाठी यापुढेही काम करणार असल्याचे म्हटले आहे.

गोव्यातील जनतेने मोठा पाठिंबा दिल्याबद्दल पाटकर यांनी आभार मानले. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी युतीच्या भागीदारांसह बुधवारी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले आणि युती कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले.

दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, आपचे अध्यक्ष अमित पालेकर, राष्ट्रवादीचे (शरद पवार) अध्यक्ष जुझे फिलिप, गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस दुर्गादास कामत आदी उपस्थित होते.

'लोकांनी भाजपविरोधात राग व्यक्त केला आहे आणि त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली आहे. दोन्ही जागा आम्ही जिंकत आहोत हे आता आम्ही आत्मविश्वासाने सांगू शकतो,' असे पाटकर म्हणाले.

गोव्याची ओळख, वारसा आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र काम करेल, असे ते म्हणाले.

Goa INDIA Alliance
Yellow Alert In Goa: गोव्यात पुढील सहा दिवस पावसाची शक्यता, दोन दिवसांसाठी 'यलो अलर्ट'

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या नेत्यांना इंडिया आघाडीची इतकी भीती होती की, दक्षिण गोवा मतदारसंघातल्या ज्या ठिकाणांना त्यांनी कधीही भेट दिली नव्हती, तिथेही ते पोहचले, असे अमित पालेकर म्हणाले.

लोकांनी भाजपविरोधात राग काढण्यासाठी मतदान केले. त्यांनी त्यांच्या विरोधात मतदान करण्यामागे कारण होते. गोव्याला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत लोक गंभीर आहेत, असे जुझे फिलिप म्हणाले.

खाणपट्ट्यात मतदारांची संख्या वाढली आहे, यावरून खाण अवलंबितांनी भाजपच्या विरोधात मतदान केल्याचे दिसून येते. आमचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास दुर्गादास कामत यांनी व्यक्त केला.

विरियातो फर्नांडिस यांनी जनतेने दिलेल्या प्रेमाचे, इंडिया आघाडी, कार्यकर्ते आणि इतरांनी पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com