Goa Temperature Dainik Gomantak
गोवा

Goa Temperature: गोवा तापणार! 10 मार्चपर्यंत कमाल तापमानात 4 ते 5 अंशांची वाढ होण्याची शक्यता

गोवा वेधशाळेचा अंदाज

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Temperature: राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काल सोमवारी राज्यातील कमाल तापमान 36 अंश होते तर आज, मंगळवारी तापमानात 1 अंशांनी वाढ होत ते 37 अंशांवर पोहोचले आहे.

कमाल तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच गोवा वेधशाळेने 10 मार्चपर्यंत कमाल तापमानात 4 ते 5 अंशांनी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने नागरिकांनी योग्य काळजी घेणे जरूरीचे आहे.

त्यासोबतच, उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग 40 ते 45 किमी प्रतितास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने पुढील 24 तास महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.

आज पणजी येथे कमाल 37 अंश सेल्सिअस तर किमान 21.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

गेल्या काही वर्षात पणजीतील मार्च महिन्यातील सर्वोच्च तापमान

तारीख तापमान (अंश सेल्यिससमध्ये)

  • 12 मार्च 1979 -------------39

  • 6 मार्च 2013 -------------- 38.7

  • 15 मार्च 2005 ----------- 38.7

  • 3 मार्च 1984 ------------- 38

  • 8 मार्च 2013 ------------- 38

  • 15 मार्च 1980 ------------ 37.9

  • 4 मार्च 2009 -------------- 37.9

  • 14 मार्च 2022 ------------ 37.8

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

SCROLL FOR NEXT