2 Drowned in Sea
2 Drowned in SeaDainik Gomantak

Drowned in Sea: होळी खेळून समुद्रात अंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू

मुरगाव तालुक्यातील सडा, बायना येथील दोन वेगवेगळ्या घटना
Published on

Drowned in Sea in Goa: दिवसभह विविध रंगांची उधळण करत होळी साजरी करून दुपारनंतर समुद्रात अंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा दोन विविध घटनांमध्ये मृत्यू झाला. यापैकी एक घटना मुरगाव तालुक्यात घडली असून दुसरी घटना बायना बीचवर घडली आहे.

2 Drowned in Sea
Gomantak Impact: तब्बल 8 दिवसांनंतर अर्चना कुमारीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

मुरगाव तालुक्यातील सडा येथे जापनीज गार्डनच्या खालील बाजूस असलेल्या समुद्रात 18 वर्षांचा युवक सुश्रृत सातार्डेकर अंघोळीसाठी गेला होता. दिवसभर त्याने होळीचा आनंद घेतला होता. त्यानंतर तो समुद्रात स्नानासाठी उतरला होता.

तथापि, पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत बायना बीच येथे 40 वर्षीय व्यक्तीचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

हे दोघेही होळी खेळून अंघोळीसाठी समुद्रात गेले होते. समुद्रात बुडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. किनाऱ्यावर लोकांनी त्यांना बाहेर काढून तत्काळ चिखली येथील उप जिल्हा रूग्णालयात दाखल केले. पण त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com