Mavin Gudinho Dainik Gomantak
गोवा

वीज बिल घोटाळा प्रकरण सुनावणीच्या वैधतेवर आता शनिवारी निकाल

पोलीस केस डायरी न्यायालयात सादर करण्याची सरकारी वकिलांची तयारी

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो मुख्य आरोपी असलेल्या 4.52 कोटींच्या वीज बिल घोटाळा प्रकरणाची सुनावणी चालू राहणार की तांत्रिक मुद्द्यावर ही सुनावणी बंद करून सर्व संशयितांना या प्रकरणातून वगळणार या महत्वाच्या मुद्यावर आता शनिवारी 16 जुलै रोजी भ्रष्टाचार विषयक प्रकरणे हाताळणारे दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा निवाडा देणार आहेत. आज हे प्रकरण सुनावणीस आले असता सरकारी वकील देवानंद कोरगावकर यांनी या प्रकरणातील पोलीस केस डायरी न्यायालयात हजर करण्याची तयारी दाखविली.

यापूर्वी गुदिन्हो यांच्या वकिलांनी हे प्रकरण भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली नोंद झाल्याने या प्रकरणी पोलिसांना पुढील तपास करण्यासाठी प्रथम वर्ग न्यायालय आदेश देऊ शकत नाही हा तांत्रिक मुद्दा पुढे आणत, या प्रकरणी जे आरोपपत्र दाखल केले आहे तेच बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी मागच्या सुनावणीच्या वेळी गुदिन्हो यांचे वकील अँड. केय डिसोझा यांनी या प्रकरणातील पोलिस केस डायरी न्यायालयात हजर करण्याची मागणी केली होती. यावर सरकारी वकिलांची बाजू ऐकून घेण्यासाठी आज सुनावणी होती.

या प्रकरणी क्राईम ब्रँचने जे आरोपपत्र ठेवले आहे. त्यानुसार गुदिन्हो काँग्रेस सरकारात वीज मंत्री असताना काही कारखान्यांना अवैद्य मार्गाने वीज बिलात सवलत देत राज्याचे 4.52 कोटींचे नुकसान केले. या प्रकरणी गुदिन्हो यांच्यासह वीज खात्यातील तत्कालीन अधिकारी आणि सवलत मिळालेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली खटला दाखल केला आहे.

मात्र या प्रकरणी एकदा तपास पूर्ण झालेला असताना पुन्हा तपास सुरू करण्यात आला. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखालील प्रकरणी तपासाचे आदेश देण्याचा अधिकार फक्त खास न्यायालयालाच असतो, प्रथम वर्ग न्यायालय आदेश देऊ शकत नाही. त्यामुळे सर्व संशयितांना आरोपमुक्त करावे अशी संशयितांच्या वकिलांनी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT