Matsyagandha Express theft case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: रेल्वे प्रवासात महिलेला लुबाडले; अखेर गुन्हा नोंद, 4.51 लाखांचा ऐवज केला होता लंपास

Matsyagandha Express theft case: मत्स्यगंधा रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका महिलेची बॅग पळवून नेत साडेचार लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना ५ फेब्रुवारी रोजी घडली होती.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: मत्स्यगंधा रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका महिलेची बॅग पळवून नेत साडेचार लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना ५ फेब्रुवारी रोजी घडली होती. याप्रकरणी मूळ मुबंईतील गोरेगाव येथील वृंदा पै यांनी शुक्रवारी (ता. २०) कोकण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

पोलिसानी भारतीय न्याय संहितेच्या ३०५ (क) कलमाखाली अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक राहूल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विप्लव वस्त पुढील तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पै या लोकमान्य टिळक टर्मिनल येथून कुमठा दरम्यान प्रवास करीत होत्या. रत्नागिरी येथून रेल्वे पुढील प्रवासाला निघाली असता पै या झोपी गेल्या होत्या.

नेमकी हीच संधी हेरून चोरट्याने त्यांची बॅग पळविली. बॅगेत मंगळसूत्र, मोबाईल, १६०० रुपये, आधारकार्ड ,डेबिट कार्ड व अन्य वस्तू मिळून ४ लाख ५१ हजार, ६०० रुपयांचा ऐवज होता. सध्या पोलिस रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA: कॅन्सरवर मात करुन 10 वर्षांनंतर संघात परतला, पण 33 चेंडू खेळूनही खातं उघडता आलं नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

Jeffrey Archer: संसद ते तुरुंग अन् तिथून 'बेस्टसेलर' लेखकापर्यंत! जेफ्री आर्चर यांचा थक्क करणारा प्रवास

Nobel Peace Prize 2026: भारतीय वंशाच्या ‘नावी’ पिल्लई यांना मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; न्यायासाठीचा संघर्ष ठरला यशस्वी

Arjun Tendulkar Injury: अर्जुन तेंडुलकरला दुखापतीचा फटका; गोव्याच्या रणजी सलामीच्या सामन्याला मुकणार!

Weightlifting Coach Recruitment: वेटलिफ्टिंग प्रशिक्षक निवडीला पुन्हा 'ब्रेक'; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण फेरसुनावणीसाठी परत

SCROLL FOR NEXT