Matoili is widely used as decorative item in Goa during Ganesh Chaturthi Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi in Goa: काणकोणात माटोळीला महत्त्व

गोव्यामधल्या गणेशोत्सवात माटोळीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. माटोळी (Matoli) ही निसर्गातील फळा-फुलांची केलेली आरस असते.

दैनिक गोमन्तक

गोव्यात गणेश चतुर्थीत (Ganesh Chaturthi in Goa) काही प्रमाणात निसर्गाची पूजा केली जाते. त्याचसाठी आजही पैंगीणमधील काही घरातून पत्रीचा गणपती पुजला जातो. रानावनात जाऊन एकवीस पत्री आणून तोच श्रीगणेश या भावनेने त्याचे पूजन (Ganesh Puja) केले जाते. माटोळी (Matoli) ही तर निसर्गातील फळा-फुलांची केलेली आरस असते. त्या निमित्ताने किमान वर्षातून एकदा गावातील माळरानावर जाऊन माटोळीतील फळा फुलांचा वेध घेण्याचे काम श्रावण संपल्यानंतर काणकोणमधील ग्रामीण भागात सुरू होते.

रान केळीचा घड, बायो वृक्षाच्या शेंगा, रान आंबाडा, रान आंबा, माट्टी कुड्याचे कात्रे व अन्य दुर्मिळ फळाफुलांचे शोध घेत रानावनात फिरणारे काही निसर्गप्रेमी आहेत, त्यापैकीच मोखर्ड येथील शिरिष पै आहेत. त्यांनी कला व संस्कृती खात्यातर्फे आयोजित माटोळी स्पर्धेत भाग घेऊन अनेक बक्षिसे पटकावली आहेत. त्याचप्रमाणे पैंगीण येथील रुपेश पैंगीणकर, गजानन बांदेकर, लोलये येथील अजय सतरकर यांनी कला व संस्कृती खात्यातर्फे आयोजित माटोळी स्पर्धेत भाग घेऊन राज्यस्तरावर अनेक बक्षिसे पटकावली आहेत.

स्पर्धेसाठी नाही किमान वर्षातून एकदा गणेश चतुर्थीच्या निमित्ताने या फळा-फुलांचा आढळ व आस्वाद घेता येतो त्याची स्थानिकांकडून माहिती मिळवता येते याचसाठी गेली पंधरा वर्षे माटोळी जमविण्याचा छंद जोपासल्याचे शिरिष पै यांनी सांगितले. काणकोणात काही गणेश भक्ताकडे फक्त नैसर्गिक वस्तूचा वापर करूनच आरस करण्याची परंपरा आहे. त्यामध्ये वेलवाडा-पैंगीण येथील संदेश पैंगीणकर, तानशी येथील दुर्गेश गावकर व अन्य गणेशभक्तांनी ही परंपरा जोपासली आहे.

नारळ, केळीची सोलपटे, नारळ-सुपारी यापासून मखर सजविण्यासाठी दिवस-रात्र ते राबत असतात. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा त्याच्या हट्टाहासाला निसर्गप्रेमींची दादही मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Love Horoscope: लग्नाचा विचार करताय? वृषभ राशीच्या लव्ह लाईफमध्ये येणार गोडवा, सुरुवातीचे 6 महिने टाळावा 'हा' मोठा निर्णय

"कधीच विराटला बोलावलं नाही, बोलावणारही नाही!", 'Koffee With Karan'मध्ये कोहलीला 'नो एन्ट्री'; करण जोहरचं धक्कादायक विधान

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Ratnagiri: 'समुद्रस्नान' जीवावर बेतलं!गणपतीपुळे समुद्रात तीन पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

SCROLL FOR NEXT