divider in Canacona Goa Dainik Gomantak
गोवा

Canacona : चाररस्ता-माशे मनोहर पर्रीकर बगलमार्गावर अखेर दुभाजक बसवला

या चौपदरी रस्त्यावर दुभाजक न घालता रस्ता खुलाच ठेवण्‍यात आला होता. त्यामुळे तेथे वारंवार अपघात होत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona : राजबाग-काणकोण येथील चाररस्ता-माशे मनोहर पर्रीकर बगलमार्गावर आंबेनास येथे बुधवारी भयंकर अपघात होऊन तिघांचा बळी गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने कोळसर येथे अखेर दुभाजक उभारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या चौपदरी रस्त्यावर दुभाजक न घालता रस्ता खुलाच ठेवण्‍यात आला होता. त्यामुळे तेथे वारंवार अपघात होत होते. आतापर्यंत या ठिकाणी अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत.

या चौपदरी रस्त्यावर दुभाजक न घालता रस्ता खुलाच ठेवण्‍यात आला होता. त्यामुळे तेथे वारंवार अपघात होत होते. आतापर्यंत या ठिकाणी अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. याठिकाणी रस्ता दुभाजक उभारण्याची मागणी स्थानिक व वाहनचालकांकडून वारंवार करण्यात येत होती. मात्र हमरस्ता विभागाने एका महिन्यापूर्वी वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी रॅमब्‍लर्स घातले होते. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. धोकादायक वळण चाररस्ता ते माशेपर्यंतच्या चौपदरी रस्त्यावर आंबेनास-राजबाग येथे धोकादायक वळण आहे. याच ठिकाणाहून एक सर्व्हीस रोड राजबाग व चावडीला जातो. त्यामुळे वाहनचालकांची या ठिकाणी गफलत होत आहे.

चाररस्ता- माशे या महामार्गावर राजबाग येथे एका वळणावर 7 सप्टेंबर रोजी दोन कारची धडक होत अपघात झाला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार कारवारच्या दिशेने जाणारी कार रस्त्याचा विभाजक ओलांडून हमरस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या दुसऱ्या कारला धडकली. ही धडक इतकी जोराची होती की, कारमधील तीन प्रवाशांना जागीच मृत्यू झाला. हे प्रवासी गाडीत अडकून पडले होते ज्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT