valpoi News Dainik Gomantak
गोवा

Valpoi: ''नव्या भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज''

दैनिक गोमन्तक

वाळपई: वाळपई येथील डॉ. के. ब. हेडगेवार हायस्कुल - पालक शिक्षक संघ, वाळपई यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत आज 14 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी वाळपई शहरामध्ये मशाल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मशाल मिरवणुकीची सांगता गोवा विद्यापीठाचे प्रा. विनय बापट "अखंड भारत" या विषयावर मार्गदर्शनाने झाली.तसेच या सभेमध्ये राष्ट्र सेविका समिती, सत्तरी तालुकाच्या स्वयंसेविका देशभक्ती गीत तसेच प्रात्यक्षिके सादर केली.

(Mashal Rally was organized by high school students of valpoi)

मशाल मिरवणुकीचे आयोजन डॉ. के. ब. हेडगेवार हायस्कुल - पालक शिक्षक संघ, वाळपई यांनी केले. ही मशाल मिरवणूक वाळपई येथील शहिद स्तंभ - सरकारी माध्यमिक विद्यालय, वाळपई बाजार ते नगरपालिका व्यासपीठ अशी काढण्यात आली आहे.

या मिरवणुकीला जास्तीत जास्त नागरीक हजर राहावेत या साठी डॉ. के. ब. हेडगेवार हायस्कुल - पालक शिक्षक संघाचे सदस्य, तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य वेगवेगळ्या गावात संपर्क करीत आहेत. या संपर्क मोहिमेचा भाग म्हणून आमशेकर हॉल वाळपई येथे बैठक घेण्यात आली.

गोवा विद्यापीठाचे प्रा. विनय बापट यावेळी बोलतना म्हणाले की, स्वातंत्र्य मिळण्याआधी या देशाची फाळणी झाली व भारत आणि पाकीस्तान असे 2 देश केले गेले. या फाळणीचा निषेध म्हणून अश्या तऱ्हेच्या मशाल मिरवणुकेचे आयोजन करण्यात येते.

आजच्या पिढीला फाळणी संदर्भात माहिती व्हावी व आपला देशाचे पुन्हा कधीच विभाजन होऊ नये या विषयी जागरण होणे गरजेचे आहे. फाळणी झाल्यामुळे या देशाचे बरेच नुकसान झाले आहे. फाळणी नंतर पाकिस्तानने आपल्या देशात दहशतवाद माजवून खूप नुकसान केले आहे. याची माहिती सुद्धा पालक व विद्यार्थी तसेच समाजाला होणे आवश्यक आहे.

या बैठकीला समाजातील अनेक स्वयंसेवी संस्था तसेच मठ व धार्मिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. रा. स्व. संघ, पतंजली योग पीठ, गायत्री परिवार, गोशाळा, वाळपई, गणेशोत्सव मंडळ, माजी सैनिक संघटना तसेच राष्ट्र सेविका समिती चे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीला डॉ. के. ब. हेडगेवार हायस्कुल, वाळपई स्थानिक व्यवस्थापन समितेचे अध्यक्ष डॉ. अशोक आमशेकर उपस्थित होते. या मशाल मिरवणुकीचे प्रमुख श्री. वामन बापट यांनी बैठकीला पूर्ण कार्यक्रमाची माहिती करून दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT