Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

पहिली पत्नी हयात असताना दुसरीशी लग्न

आरोपीला दोन वर्षे तुरूंगवास, दहा लाखांचा दंड

दैनिक गोमन्तक

सांगे : एक पत्नी हयात असताना तिला घटस्फोट न देता दुसरे लग्न केल्याप्रकरणी कुळे येथील साईनाथ खांडेपारकर याला कलम 494 अन्वये दोन वर्षे सश्रम कारावास व दहा लाखांचा दंड,अशी शिक्षा शनिवारी (दि.11) सांगे न्यायालयाने सुनावली.

न्यायाधीश सुनीता गावणेकर यांच्या न्यायालयाने सदर शिक्षा सुनावली आहे. खोटी कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी खांडेपारकर याला कलम 193 अन्वये एक वर्षाचा सश्रम कारावास व पाच हजारांचा दंड ठोठावला आहे.

कुळे येथील साईनाथ खांडेपारकर याने पहिले लग्न सांगे येथील लग्न नोंदणी कार्यालयात कागदपत्रे सादर करून केले होते.

आरोपीने दुसरे लग्न पहिली पत्नी असताना घटस्फोट न देताच धारबांदोडा येथील विवाह नोंदणी कार्यालयात खोटी कागदपत्रे सादर करून केले होते.

...तर पुन्हा एक वर्ष कारावास

निर्धारित वेळेत दहा लाखांची रक्कम जमा न केल्यास आणखी एक वर्ष सक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असेही आदेशात म्हटले आहे. अर्जदाराची बाजू अॅड. अभिलाषा शिवाजी नाईक यांनी मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jantar Mantar Student Protest: जंतर मंतर छू:मंतर; गांधीवादी मार्गाने जिंकला जंतर-मंतरवरील लढा

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

खरी कुजबूज: काँग्रेस विचार बदलणार?

Goa Water Issue: तीन महिन्यांतून एकदा वॉटर मीटर तपासणी सक्तीची! गोवा मानवाधिकार आयोगाचे PWD आणि आरोग्य खात्याला कडक निर्देश

Mapusa Traffic Police: म्हापशाच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅमला बसणार ब्रेक! 'वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवा!' उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

SCROLL FOR NEXT