Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: गोळीबार संशयित डिसोझाने पासपोर्ट पोलिसांना द्यावा!

Goa Crime News: पैशांच्‍या वादातून मडगावातील लालू खान याच्‍यावर गोळीबार करण्‍याचा आरोप असलेल्‍या संशयित रसेल डिसोझा जामिनावर मुक्‍त

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: पैशांच्‍या वादातून मडगावातील लालू खान याच्‍यावर गोळीबार करण्‍याचा आरोप असलेल्‍या संशयित रसेल डिसोझा याला दक्षिण गोव्‍याच्‍या अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश पूजा कवळेकर यांनी जामिनावर मुक्‍त करताना पुढचे १५ दिवस फातोर्डा पोलिस स्‍थानकावर हजेरी लावण्‍या व्‍यतिरिक्‍त इतर कुठल्‍याही गोष्‍टीसाठी मडगावात पाऊल न ठेवण्‍याची अट घातली आहे.

गेल्या गुरुवारी डिसोझा याने खान याच्‍यावर तीन गोळ्‍या झाडल्‍या होत्‍या. त्‍यानंतर तो पोलिसांना शरण आला होता. पोलिसांनी त्‍याच्‍यावर खुनाचा प्रयत्‍न केल्याचा गुन्‍हा नोंद केला होता. त्‍यानंतर त्‍याची रवानगी कोलवाळ तुरुंगात करण्‍यात आली होती.

आज ॲड. विनय पाटकर यांनी जामिनासाठी हा अर्ज दाखल केला होता. न्‍या. कवळेकर यांनी हा अर्ज मंजूर करताना डिसोझा याला 30 हजाराच्‍या जामिनावर मुक्‍त करताना 15 दिवस पोलिस स्‍थानकावर हजेरी लावण्‍याची अट घातली आहे. त्‍याशिवाय संशयिताने आपला पासपोर्ट पोलिसांना द्यावा, असे म्‍हटले आहे.

डिसोझा आणि खान या दोघांमध्‍ये रेस्‍टॉरन्‍टच्‍या डिपॉझीटवरुन वाद चालू होता, डिसोझा याचे रेस्‍टॉरन्‍ट चालवायला घेत असताना खान याने दोन लाख रुपयांचे डिपॉझीट दिले होते.

सदर कंत्राट संपल्‍यानंतर खान याने रेस्‍टॉरन्‍टचा ताबा सोडला. मात्र त्‍याचे दोन लाख रुपये डिसोझा याच्‍याकडून परत न मिळाल्‍याने त्‍यासाठी त्‍याने तगादा

लावला होता. यासाठी धमकावण्‍यासाठी संशयिताने हा गोळीबार केल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT