Margao Electricity Department Dainik Gomantak
गोवा

Margao: मडगावात शनिवारी वीजपुरवठा खंडित! 'या' भागांमध्ये चालणार दुरुस्तीचं काम

Margao Electricity Department: आके मडगाव येथील वीज उपकेंद्रावरील ३३-११ केव्ही फिडरवर आवश्यक दुरुस्ती आणि देखभालीची कामे हाती घेण्यात येणार.

गोमंतक ऑनलाईन टीम

आके मडगाव येथील वीज उपकेंद्रावरील ३३-११ केव्ही फिडरवर आवश्यक दुरुस्ती आणि देखभालीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने शनिवारी, 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत काही भागात वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वीज विभागाने याबाबत आगाऊ सूचना दिलीय.

वीज खात्याच्या माहितीनुसार, या देखभाल कामांमुळे उपकेंद्राच्या कार्यक्षमतेत वाढ होणार असून आगामी काळात पुरवठा अधिक स्थिर आणि सुरळीत राहण्यासाठी ही दुरुस्ती आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी नियोजित वेळेत वीजपुरवठा बंद राहणार असल्याची नोंद घेऊन पर्यायी व्यवस्था करून सहकार्य करावे, असे आवाहन साहाय्यक वीज अभियंत्याने केले आहे.

वीजपुरवठा खंडित होणाऱ्या परिसरात मालभाट, विद्यानगर, आके, खारेबांद, आके बायश, शिरवडे, कालकोंडा, अग्निशमन केंद्राजवळील परिसर, मडगाव रेल्वे स्टेशन, जुने रेल्वे स्टेशन परिसर आणि रुमडामळ हाऊसिंग बोर्ड यांचा समावेश आहे. या सर्व भागांमध्ये पाच तासांचा वीजपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यक ती तयारी ठेवणे गरजेचे आहे.

दरम्यान, वीज विभागाने सर्व संबंधित तांत्रिक पथकांना दुरुस्तीचे काम वेळेत आणि सुरक्षितपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेसला भीती उमेदवार चोरीची?

Goa Fraud Case: बनावट 'आयपीओ'चे आमिष; ज्येष्ठाची 4 कोटींची फसवणूक, कोल्हापूर येथून संशयिताला अटक

पैसे परत न केल्यास FIR! वादग्रस्त 'कामसूत्र अँड ख्रिसमस' कार्यक्रमावर क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

Goa Politics: काँग्रेस युतीस तयार; जागांबाबत विजय, मनोजशी लवकरच चर्चा; गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांची माहिती

T20 World Cup 2026 मध्ये भारत-पाकिस्तान भिडणार, कधी आणि कुठे होणार हाय-व्होल्टेज सामना? मोठी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT