Goa Tiger Reserve Controversy: केंद्रीय सक्षम समितीचा 'तो' अहवाल दबाव तंत्राखालीच! व्याघ्र क्षेत्राविषयी पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांचा दावा

Tiger Reserve: न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय सक्षम समितीने गोव्यातील म्हादई आणि परिसरातील अभयारण्याचा व्याघ्र क्षेत्रामध्ये समावेश व्हावा, यासाठी जो अहवाल तयार केला आहे, त्या अहवालातील शिफारशी खरोखरच धक्कादायक आहेत.
Goa Tiger Reserve Controversy
Goa Tiger Reserve ControversyDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय सक्षम समितीने गोव्यातील म्हादई आणि परिसरातील अभयारण्याचा व्याघ्र क्षेत्रामध्ये समावेश व्हावा, यासाठी जो अहवाल तयार केला आहे, त्या अहवालातील शिफारशी खरोखरच धक्कादायक आहेत, असे केरी-सत्तरी येथील पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र केरकर यांनी सांगितले.

केरकर म्हणाले, की त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये खोतिगाव, नेत्रावळी, महावीर अभयारण्य आणि महावीर राष्ट्रीय उद्यान या चार संरक्षित वनांचा गोवा राज्य व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये समावेश करावा, असे म्हटले आहे.

दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकांशी विस्तृतपणे चर्चा केल्यानंतरच म्हादई अभयारण्य आणि जो महावीर अभयारण्याचा भाग आहे, त्याचा दुसऱ्या टप्प्यामध्ये व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये समावेश करावा, अशी त्यांनी शिफारस केलेली आहे. एकंदरीत या शिफारशी पर्यावरण क्षेत्रात वन्य जीवांच्या संवर्धनासाठी धोकादायकच आहेत. कारण एकंदर परिस्थितीचा अभ्यास केला तर लक्षात येते, की म्हादई अभयारण्यात प्रामुख्याने वाघांचा अधिवास असून यापूर्वी २००९ ते २०१९ या दहा वर्षांच्या कालखंडात पाच वाघ मृत झाले आहेत.

Goa Tiger Reserve Controversy
Goa Temple Festival: शांतादुर्गा वेर्डेकरीण देवस्थानचा कालोत्सव, 28 पासून विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

त्यामुळे म्हादई अभयारण्य परिसरामध्ये वाघांचे अस्तित्व आहे, हे नाकारून हा अहवाल तयार केला आहे. गोवा सरकारने आपली बाजू स्पष्ट केली आहे, की हे व्याघ्र क्षेत्र राखीव झाले तर त्याचे दुष्परिणाम गोव्याच्या जनतेवर होणार आहेत; परंतु केंद्रीय सक्षम समितीने जो अहवाल दिला आहे, तो निश्चितपणे दबाव तंत्राखाली दिला आहे.

Goa Tiger Reserve Controversy
Goa Tourism: गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रूझ पर्यटनाचा श्रीगणेशा! 'सेलिब्रिटी मिलेनियम'मधून 2000 प्रवासी दाखल

वाघांच्या हत्येची दखलच नाही

२००९ ते २०२० च्या दशकात म्हादईच्या खोऱ्यात दोन बछडे, एक निम्न प्रौढ आणि एक वाघीण तसेच आणखी एका वाघाची म्हणजे ५ वाघांच्या झालेल्या हत्येची मुळी दखलच घेतलेली नाही. केंद्रीय सक्षम समितीने म्हादई अभयारण्याला व्याघ्र राखीव क्षेत्रात समाविष्ट करण्यासंदर्भात बाळगलेले मौन धक्कादायक आहे.

म्हादई अभयारण्याला व्याघ्र राखीव क्षेत्राचा दर्जा देणे म्हणजेच म्हादईचे अस्तित्व राखणे याचे भान प्रत्येक गोमंतकीयाने ठेवणे गरजेचे आहे, असे केरकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com