Goa Margao Stray Dogs Dainik Gomantak
गोवा

Margao News: पुढे काय? मडगावात भटक्‍या कुत्र्यांची समस्‍या नियंत्रणासाठी प्राणी संस्‍थेशी करार पण..

Margaon Municipal Council: मोठ्या प्रमाणात भटक्‍या कुत्र्यांची संख्‍या असलेल्‍या मडगाव पालिका क्षेत्रात प्राणी जन्‍म नियंत्रण (एबीसी) कार्यक्रम पुढे नेण्‍यासाठी नगरपालिकेने दोन महिन्‍यापूर्वी प्राणी कल्‍याण संस्‍थेशी करार केलेला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Margao Municipality To Control Stray Dog Population

मडगाव: जागतिक रेबीज प्रतिबंधक दिन २८ सप्‍टेंबर रोजी साजरा करण्‍यात आला. या वर्षीची संकल्‍पना ‘ब्रेकिंग रेबीज बाउंडरीज’ अशी होती, ज्‍यात नावीन्यपूर्ण रणनीती आणि सहयोगाची गरज यावर भर देण्‍यात आला होता. मोठ्या प्रमाणात भटक्‍या कुत्र्यांची संख्‍या असलेल्‍या मडगाव पालिका क्षेत्रात प्राणी जन्‍म नियंत्रण (एबीसी) कार्यक्रम पुढे नेण्‍यासाठी नगरपालिकेने दोन महिन्‍यापूर्वी प्राणी कल्‍याण संस्‍थेशी करार केलेला आहे. मात्र ही समस्‍या नियंत्रणात येत असल्‍याची चिन्‍हे अजून तरी दिसलेली नाहीत.

मडगाव नगरपालिकेचे माजी मुख्‍याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी यासंदर्भात निविदेसाठी कोडल औपचारिकतेचे पालन करण्‍याची अनिवार्य तरतूद रद्द केली होती. शहरात एबीसी कार्यक्रम पुढे नेण्‍याचे काम वरील कल्‍याणकारी संस्‍थेला दिले आहे. २०२० मध्‍ये संस्‍थेकडील सामंजस्‍य करार कालबाह्य झाल्‍यानंतर पालिकेने नवीन करार करण्‍याच्‍या बाबतीत माघार घेतली होती. आता पुन्‍हा प्राणी कल्‍याण संस्‍थेला कार्यादेश दिल्‍याने अनेक प्रश्‍‍न उपस्‍थित झाले आहेत.

मुख्‍य म्‍हणजे भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला असून शहरभर कुत्र्यांचा वावर दिसून येत आहे. कुत्र्यांच्‍या उपद्रवाबाबत एखाद्या नागरिकाने पालिकेशी वा नियुक्‍त संस्‍थेशी संपर्क साधण्‍याच्‍या दृष्‍टीने समर्पित मोबाईल क्रमांक किंवा हेल्‍पलाईनबद्दल स्‍पष्‍टता नाही.

नागरिकांना प्रश्‍न

गेल्‍या वर्षी मिशन रेबीजने इतर संस्‍थांसोबत मडगाव येथे महिनाभर चाललेल्‍या शिबिरात दोन हजारहून अधिक कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले होते. त्‍यामुळे पालिकेच्‍या एबीसी कार्यक्रमाच्‍या कार्यक्षमतेवर प्रश्‍‍न उपस्‍थित केले जात आहेत. पाजीफोंड येथील रहिवाशांनी पालिकेच्‍या एबीसी कार्यक्रमावर प्रश्‍‍न उठवताना भटक्‍या कुत्र्यांची संख्‍या कमी होण्‍याची चिन्‍हे दिसत नाहीत. याकडे लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT