नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर gomantak digital team
गोवा

Bicholim : मडगाव शहर करणार कचरामुक्त; आकेपासून सुरूवात : नगराध्यक्ष

गोमंतक भंडारी समाजच्या युवा समितीने आज रविवारी समाजाच्या सभागृह परिसरात वनमहोत्सवाचे आयोजन केले होते

गोमंतक ऑनलाईन टीम

आके-मडगाव येथील चार प्रभाग कचरामुक्त करण्याची घोषणा नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यानी आज केली. त्यांनी सांगितले की, विद्यानगर सरकारी शाळा, सेंट जोसेफ, टी. बी. कुन्हा तसेच इतर शाळांतील विद्यार्थ्यांचे गट तयार करून ही मोहीम राबवली जाईल व पुढील महिन्यापासून ती सुरू होईल.

संपूर्ण मडगाव शहर कचरामुक्त व्हावे अशी आमची इच्छा आहे. सुरूवात आम्ही आकेपासून करीत आहोत असे सांगून शिरोडकर म्हणाले की, कचरा उचलणे सोपे पण तो नेऊन टाकावा कुठे हा प्रश्‍‍न सर्वांसमोर आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ राखण्यासाठी प्रयत्न करणे व त्या दृष्टीने जागृती करणे गरजेचे आहे. ही मोहीम नगरपालिकेच्या खर्चातून राबवली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोमंतक भंडारी समाजच्या युवा समितीने आज रविवारी समाजाच्या सभागृह परिसरात वनमहोत्सवाचे आयोजन केले होते. त्‍यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर उपस्थित होते. दादी मयेकर यांनी झाडांचे महत्त्‍व सांगितले. सुनील कृ. नाईक यांनीही विचार व्यक्त केले. वनमहोत्सवाला अमर शिरोडकर, वासुदेव विर्डीकर, नगरसेवक सिद्धांत गडेकर, नर्मदा कुंडईकर, युवाध्यक्ष निखिल बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT