Bicholim News : भाजप सरकारच्या प्रगतीबाबत जनता पूर्ण समाधानी - प्रेमेंद्र शेट

प्रेमेंद्र शेट : ‘संपर्क से समर्थन’ला डिचोलीत प्रतिसाद; रविवारी व्यापारी मेळावा
Premendra Shet
Premendra ShetGomantak Digital Team
Published on
Updated on

Bicholim News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असून, भाजप सरकारच्या प्रगतीबाबत जनता पूर्ण समाधानी आणि आशावादी आहे, असे मत मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी गुरुवारी (ता.८) डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. भाजपच्या ‘संपर्क से समर्थन’ मोहिमेला मयेसह डिचोली मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानात भाजपचे नेते सहभागी होत आहेत.

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून देशाची सूत्रे स्वीकारल्यास नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. भाजप सरकारचे कार्य जनतेपर्यंत पोहोचावे या अनुषंगाने महाजनसंपर्क अभियानांतर्गत भाजपतर्फे ‘संपर्क से समर्थन’ मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Premendra Shet
Bicholim Road Issue: डिचोलीतील खोदलेला रस्ता पूर्ववत करण्याची मागणी

या पार्श्वभूमीवर डिचोलीत घेतलेल्या पत्रकार पारिषदेवेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय शेट्ये, डिचोली भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास गावकर, सरचिटणीस डॉ. कौस्तुभ पाटणेकर, मये भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर, सरचिटणीस विश्वास चोडणकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. कौस्तुभ पाटणेकर यांनीही अभियानाविषयी माहिती दिली.

Premendra Shet
Bicholim : अनुकूल हवामानामुळे काजू उत्पादनात वाढ

सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी मेळावा

येत्या रविवारी (ता.११) डिचोलीतील व्यापाऱ्यांसाठी मेळावा घेण्यात येणार आहे. दीनदयाळ सभागृहात होणाऱ्या या मेळाव्यास भाजपचे गोवा प्रभारी सी.टी. रवी यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थींसाठीही मेळावा घेण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिन यशस्वी करण्यासाठी भाजप कार्यकर्ते तळमळीने सहभाग घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com