Margao News Dainik Gomantak
गोवा

Margao News: मडगाव उपनगराध्यक्ष निवड उद्या

Margao News: नगरसेविका बबिता नाईक यांची वर्णी शक्य

दैनिक गोमन्तक

Margao News: मडगावच्या उपनगराध्यक्ष दीपाली सावळ यांनी पदाचा दिलेला राजीनामा पालिका संचालनालयाने स्वीकारला असून नव्या उपनगराध्यक्षांची निवडणूक मंगळवार 13 रोजी सकाळी 11 वाजता निश्र्चित केली आहे.

सासष्टीचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर यांची निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. उपनगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्या नगरसेवकांनी 12 फेब्रुवारी दुपारपूर्वी मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांच्या कार्यालयात नावे द्यावीत, असे सूचित करण्यात आले आहे.

दरम्यान, सत्ताधारी भाजपचे 16, गोवा फॉरवर्डचे 8 व एक अपक्ष नगरसेवक आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्याच गटातील उपनगराध्यक्षपदावर आरूढ होईल, हे निश्‍चित वाटत असले तरी सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांत नेमके कुणाला पद द्यावे, याबद्दल नगरसेवकांमध्ये मतभेद असल्याचे सूत्रांकडून समजते.

फातोर्ड्याच्या नगरसेविका बबिता नाईक यांचे नाव सर्वांत पुढे आहे व बहुतेक नगरसेवकांचे समर्थन त्यांना मिळेल, असे वाटते. एसटी समाजातील एक- दोन नगरसेवकही या पदासाठी इच्छुक असल्याचे कळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT