Margao Dainik Gomantak
गोवा

Margao News : ‘साळावली’त जूनपर्यंत पुरेल इतका जलसाठा

Margao News : सध्‍या ३४ टक्‍के पाणी उपलब्‍ध : मात्र, वाढत्‍या उष्णतेचा फटकाही बसू शकतो

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News :

मडगाव, संपूर्ण दक्षिण गाेव्‍याला पाणी पुरवठा करणाऱ्या साळावली जलाशयात सध्‍या ३४ टक्‍के पाणी उपलब्‍ध असून जर जून ६ पर्यंत पाऊस सुरु झाला तर तोपर्यंत लाेकांना पिण्‍यासाठी हे पाणी पुरेसे आहे, असे सांगितले जाते.

मात्र, सध्‍या गोव्‍यात कडक उन्‍हाळा असल्‍याने या पाण्याचे बाष्पिभवन होऊन ते झपाट्याने आटले, तर मात्र काही प्रमाणात अडचण उद्भवू शकते.

साळावली जलाशयातून मडगाव, वास्‍को, केपे, सांगे तसेच सासष्‍टीतील अन्‍य गावांना पाण्‍याचा पुरवठा केला जातो. दक्षिण गोव्‍यातील पाणी पुरवठ्यासाठी साळावली हा एकमेव प्रमुख जलस्रोत उपलब्‍ध आहे.

साळावली पाणी प्रकल्‍पातील कार्यकारी अभियंते श्रीकांत गावकर यांनी दिलेल्‍या माहितीप्रमाणे, सध्‍या साळावली जलाशयातील पाण्‍याचे प्रमाण ३४ टक्‍क्‍यांवर पाेचले आहे. मात्र, हे पाणी जून महिना सुरु होईपर्यंत पुरवठा करण्‍यासाठी पुरेसे आहे, असे त्‍यांनी सांगितले.

असे जरी असले तरी सध्‍या गोव्‍यात कडक उन्‍हाळा सुरू असून त्‍यामुळे पाण्‍याचे बाष्‍पिभवन जलदगतीने होत आहे. हा उन्‍हाळा अधिक कडक झाल्‍यास जलाशयातील पाणी आटून काही प्रमाणात अडचणी उद्‍भवू शकतात, अशी भीतीही व्‍यक्‍त केली जात आहे.

गोव्‍यातील साळावलीसह विविध धरणांत जो पाणीसाठा उपलब्‍ध आहे, ताे येत्‍या ९० दिवसांसाठी पुरेसा आहे. त्‍यानंतर पावसाळा सुरू होत आहे. त्‍यामुळे गोमंतकीयांना पाण्याच्या उपलब्धतेबाबत चिंता करण्‍यासारखी कुठलीही बाब नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नव्वदमध्ये गोव्यातील गुन्हेगार रवींच्या नावाने थरथर कापत होते; महाराष्ट्रापर्यंत पोहोचला होता दबदबा

अग्रलेख: दरोडेखोरांना गोव्‍यात साह्य कुणी केले?

Goa Today's News Live: गोव्यात एक दिवसाची शासकीय सुट्टी; तीन दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर

Asia Cup: भारतीय संघाने दवडली संधी! पात्रता लढतीत सिंगापूरची मुसंडी; युईयाँगचे शानदार प्रदर्शन

Horoscope: 'या' 3 राशींसाठी आजचा दिवस खास! मोठी बातमी मिळणार; आर्थिक घडी बसणार

SCROLL FOR NEXT