Margao RPF arrested Three Accused  Dainik Gomantak
गोवा

Goa Express: ट्रेनमधील प्रवाशांना गुंगीचे औषध पाजून लुटणाऱ्या तिघांना अटक; रेल्वे पोलिसांची कारवाई

संशयितांकडून शीतपेय, झोपेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

Rajat Sawant

Margao RPF Arrested Three Accused: गोव्‍यातून सुटलेल्‍या निजामुद्दीन एक्‍सप्रेसमधील आठ युवकांना गुंगीचे औषध देवून त्‍यांना लुटण्‍याची घटना 12 सप्टेंबरला घडली होती. कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये अशाच एका प्रकरणाची नोंद झाली होती. ही दोन्ही प्रकरणे गोवा रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली होती.

दरम्यान या प्रकरणातील संशयित तिघा आरोपींना पकडण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून शीतपेय, झोपेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणांची तक्रार वर्ग होताच आरपीएफ निरीक्षक विनोद मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली आरपीएफ मडगाव आणि वास्को एसडब्लूआरची एक टीम तैनात करण्यात आली होती.

पथकाने तक्रारदारांनी दिलेल्या वर्णनाच्या विश्लेषणावरून विविध स्थानकांच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले. साध्या वेशात विविध गाड्या आणि स्थानकांवर कडेकोट नजर ठेवली होती. अखेर सोमवारी मडगाव आरपीएफच्या पोलिसांनी मडगाव रेल्वे स्थानकातून या प्रकरणातील 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

सरताज (29), चंदन कुमार (23) आणि दारा कुमार (29) तीघेही मूळ. बिहार अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितांची चौकशी केली असता झोपेच्या गोळ्या चॉकलेट किंवा शीतपेयामध्ये मिसळून ट्रेनमध्ये प्रवाशांना देत. प्रवासी बेशुद्ध झाल्यानंतर त्यांचे सामान लुटत असल्याचे संशयितांनी सांगितले.

संशयितांकडून शीतपेय, झोपेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील कारवाईसाठी त्यांना गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Lalbagh Mango: कर्नाटकातील 'लालबाग' आंबा डिचोलीच्या बाजारपेठेत दाखल, किलोचा दर 200 रुपये

ZP Election 2025: सावर्डेत मोहन, आतिष यांच्यात थेट लढत; आरजी, काँग्रेस रिंगणात, आमदार गणेश गावकर यांची प्रतिष्ठा पणाला

Richard Mille luxury watch: अंबानींची 'रॉयल' भेट! लिओनेल मेस्सीला दिलं 11 कोटींचं घड्याळ, 'रिचर्ड मिल' ब्रँडचं वैशिष्ट्यं काय?

सायबर गुन्ह्यांविरुद्ध 'मूग गिळून गप्प' बसू नका: तक्रार करा, साखळी तोडा!

थायलंड समजून गोव्यात येऊ नका! नाईटक्लब बंद करण्याची भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांची मागणी

SCROLL FOR NEXT