Margao Pre Monsoon Work  Dainik Gomantak
गोवा

Margao: मडगावात मान्सूनपूर्व कामांना वेग, 'चकाचक फातोर्डा' मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातील कामे झाली पूर्ण

Margao Pre Monsoon Work 2026: मडगाव शहरात मान्सूनपूर्व कामांना यंदा चांगलीच गती मिळाल्याचे चित्र असून नगरपालिकेसोबतच विविध स्तरांवरून स्वच्छता व दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: मडगाव शहरात मान्सूनपूर्व कामांना यंदा चांगलीच गती मिळाल्याचे चित्र असून नगरपालिकेसोबतच विविध स्तरांवरून स्वच्छता व दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. शहरातील बहुतांश प्रभागांतील कामे पूर्णत्वाकडे आली असून उर्वरित प्रभागांमध्येही कामांना वेग देण्यात येत आहे.

नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले की, नगरपालिकेच्या जास्तीत जास्त प्रभागांतील कामे पूर्ण होत आली असून केवळ चार ते पाच प्रभागांमधील कामांना या आठवड्यात सुरुवात होणार आहे. प्रत्येक प्रभागासाठी पाच दिवसांच्या कालावधीसाठी मजूर व वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय अतिरिक्त वाहन उपलब्ध करून देण्यात येत असून या महिन्याअखेरीस सर्व प्रभागांतील कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

मडगाव नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ११ मडगाव, ११ फातोर्डा व ३ कुडतरी असे प्रभाग समाविष्ट आहेत. यापैकी फातोर्डा मतदारसंघातील ११ प्रभागांमध्ये आमदार विजय सरदेसाई यांच्या पुढाकारातून ‘चकाचक फातोर्डा’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची जबाबदारी हर्षद नायक यांच्याकडे सोपविण्यात आली असून त्यांनी पहिल्या टप्प्यातील सर्व प्रभागांतील कामे पूर्ण झाल्याचे सांगितले.

याअंतर्गत नाले स्वच्छ करणे, कचऱ्याचे व मातीचे ढीग काढणे, तसेच रस्त्यालगतची झाडे व फांद्या छाटणे अशी विविध कामे करण्यात आली आहेत. काही ठिकाणी अनेक वर्षांपासून नाले स्वच्छ न झाल्याचेही आढळून आले. त्यामुळे या मोहिमेला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

हर्षद नायक यांनी पुढे सांगितले की, दुसऱ्या टप्प्याची कामे सुरू होत असून ती पूर्ण करण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. प्रत्येक प्रभागात १२ मजूर, एक पर्यवेक्षक, वाहन व चालक उपलब्ध करून देण्यात येत आहे. पाजीफोंड परिसरातील ११ प्रभागांतील कामे पूर्ण करण्यासाठी सुमारे दहा दिवस लागल्याचे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT