Goa Drug Case 
गोवा

Goa Drug Case: डिलिव्‍हरी करायला आला अन् जाळ्यात अडकला, मडगाव रेल्‍वे स्‍थानकाजवळ 2.71 लाखांचे अमली पदार्थ जप्त

Goa Drug Case: संशयित या ड्रग्‍सची डिलिव्‍हरी कुणाला तरी करायला मडगावात आला असावा असा पोलिसांचा संशय आहे.

सुशांत कुंकळयेकर

Goa Drug Case

मडगाव पोलिसांनी काल रात्री मडगाव रेल्‍वे स्‍थानकाजवळ आके भागात केलेल्‍या कारवाईत आनंद हरिश्र्‍चंद्र साळगावकर (41) याला अटक करुन त्‍याच्‍याकडून 2.71 लाखांचे अंमली पदार्थ पकडले.

संशयित या ड्रग्‍सची डिलिव्‍हरी कुणाला तरी करायला मडगावात आला असावा असा पोलिसांचा संशय आहे. सध्‍या या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समीर गावकर हे तपास करीत आहेत.

तसेच, तळेवाडो-बाणावली येथे कोलवा पोलिसांनी महमद हलगरी (24) या युवकाला सुमारे एक किलो गांजासह पकडले. त्‍याची किंमत आंतरराष्‍ट्रीय बाजारात सुमारे एक लाख रुपये एवढी आहे.

मडगाव पोलिस स्‍थानकाचा सध्‍या ताबा सांभाळणारे पोलिस निरीक्षक थॅरन डिसोझा यांनी दिलेल्‍या माहितीप्रमाणे, या संशयिताकडून 3.80 ग्राम एमएमडीए, 18 अ‍ॅक्‍टसी टॅबलेटस्, 14.66 ग्राम चरस आणि 68 ग्राम एलएसडी पेपर्स असा माल जप्‍त केला असून रात्री 12.30 ते पहाटे 6.15 दरम्‍यान ही कारवाई केल्‍याची माहिती त्‍यांनी दिली.

सदर इसम अमली पदार्थ घेऊन मडगावात येणार याची माहिती मडगाव पोलिसांना मिळाल्‍यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्‍याला ताब्‍यात घेतले. या संशयितावर यापूर्वी आणखी काही गुन्‍हे नोंद आहेत का याचा तपास पोलीस करत असून हा माल तो कुणाला द्यायला आला होता त्‍याचाही तपास केला जात आहे.

काल रात्रीच कोलवा पोलिसांनी तळेवाडो-बाणावली येथे केलेल्‍या कारवाईत महमद मुश्‍‍ताफा हलगरी या युवकाला अटक करुन त्‍याच्‍याकडून एक किलो गांजा पकडला.

सदर युवक मूळ हावेरी-कर्नाटक येथील असून तो पॉवरहाऊस मडगाव येथे रहात असल्‍याची माहिती कोलवाचे पोलीस निरीक्षक थॅरन डिसोझा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohan Bhagwat: सातत्य आणि जुळवून घेण्याची क्षमता, मोहन भागवत यांच्या नेतृत्वाची खरी ताकद

Goa IIT Campus: साक्षरतेत अव्वल असलेलं गोवा, 10 वर्षांनंतरही IIT' कॅम्पससाठी कायमस्वरूपी जागा न मिळणं ही मोठी शोकांतिका

Goa Politics: खरी कुजबुज, बाबूश यांच्‍या मनात आहे तरी काय?

रस्ता चुकला, गाडी चिखलात रुतली; मनालीतून गोव्याला येताना रशियन महिलेवर आले संकट, पोलिस, स्थानिक धावले मदतीला

Goa Live News: महाराष्ट्रात MRF गोवा भरती; विजय यांनी केली भाजप सरकारवर टीका

SCROLL FOR NEXT