Scam In Goa: सावधान! गोव्यात नवा स्कॅम, तुम्हालाही येऊ शकतो रक्तदानाविषयी फोन

Scam In Goa: टायगर असोसिएशनचे संस्थापक राहुल शानबाग यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Scam In Goa
Scam In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Scam In Goa

फसवाफसवीचा नवा प्रकार गोव्यातून समोर आला असून, रक्तदान करण्याचे आश्वासन देऊन पैशाची उकळणी केली जात आहे. याप्रकरणी टायगर असोसिएशनचे संस्थापक राहुल शानबाग यांच्याकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भारतीय टायगर संघटनेचे संस्थापक राहुल शानबाग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रोहित नावाचा एक व्यक्ती 9910388985 या क्रमांकावरुन रक्ताची गरज असलेल्या नागरिकांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना फोन करत रक्तदान करण्याचे करण्याचे आश्वासन देतो.

रक्तदानाच्या बदल्यात हा व्यक्ती पैशाची मागणी करतो आणि पैसे घेतल्यानंतर संबधित नंबर तो ब्लॉक करतो, असे या तक्रारीत म्हटले आहे.

रक्तदानाचे आश्वासन देऊन पैसे उकळणे आणि नंतर नंबर ब्लॉक करुन गायब होणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून, लोकांची फसवणूक केली जात आहे, असा आरोप या तक्रारीतून केला आहे.

Scam In Goa
Flights To Goa: आणखी एका शहरातून गोव्याला थेट विमानसेवा सुरू होणार; 2 कंपन्या रांगेत

पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबधिताला अटक करावी, अशी मागणी राहुल शानबाग यांनी केली आहे. अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आवाहन शानबाग यांनी केले आहे. तक्रारीची प्रत गृहखात्यासह उत्तर, दक्षिण पोलिस आणि सायबर गुन्हे शाखेला देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Job Scam
Cyber Fraud
 Goa Facebook Part Time Job Scam
 Goa Online Investment Fraud
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com