Yogesh Shetkar  Dainik Gomantak
गोवा

Margao Fraud Case: फरार योगेशविरोधात ‘लुक आऊट’ नोटीस का नाही? पोलिसांच्‍या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह

Margao Police: मडगाव पोलिस कुणाच्‍या दबावाखाली तपासात दिरंगाई करत तर नाहीत ना हा प्रश्र्‍न लाेक करत आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: मडगावच्‍या फेस्‍ताच्‍या फेरीच्‍या सोपो करातून आलेली १७ लाखांची रक्‍कम पालिकेच्‍या तिजोरीत न भरता परस्‍पर स्‍वत:च्‍या खात्‍यात वळवून लाखोंचा गफला करण्‍याचा आरोप असलेला मडगाव पालिकेचा कारकून योगेश शेटकर हा सध्‍या फरार आहे, असा दावा करून मडगाव पोलिसांनी अद्याप त्‍याला अटक केलेली नाही. मात्र, सुमारे महिनाभरापूर्वी तक्रार दाखल करूनही जर संशयित अटक चुकवत असेल तर मडगाव पोलिस त्‍याच्‍याविराेधात लुक आऊट नोटीस का जारी करत नाहीत?

सध्‍या मडगावात हाच विषय चर्चेत असून मडगाव पोलिस कुणाच्‍या दबावाखाली तपासात दिरंगाई करत तर नाहीत ना हा प्रश्र्‍न लाेक करत आहेत. मडगाव पोलिसांच्‍या कार्यक्षमतेवरही आता नागरिकांनी बाेट ठेवण्‍यास सुरू केले आहे.

याप्रकरणी मुख्‍यमंत्री आणि मुख्‍य सचिव यांच्‍याकडे तक्रार करणारे शॅडो कौन्‍सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्‍हो यांनीही मडगाव पाेलिसांच्‍या तपासावर प्रश्र्‍नचिन्‍ह उभे करताना या संशयिताला पाेलिसांना खरेच अटक करायची आहे का, असा सवाल केला.

याप्रकरणी मडगाव पाेलिसांशी संपर्क साधला असता, संशयिताला अटक करण्‍यासाठी कित्‍येकवेळा पोलिस त्‍याच्‍या घरी गेले. मात्र, तो घरी सापडत नाही, असे सांगण्‍यात आले. फौजदारी आचारसंहितेच्‍या ४१ कलमाखाली त्‍याला चौकशीसाठी मडगाव पोलिस स्‍थानकावर हजर राहावे, अशी दोनवेळा नोटीस जारी केली आहे. संशयिताच्‍या विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे का, अशी विचारणा केली असता, पोलिसांकडून नकारार्थी उत्तर मिळाले.

चाैकशी प्राथमिक अवस्‍थेतच

यासंदर्भात पालिका मुख्‍याधिकारी गाैरीश शंखवाळकर यांच्‍याशी संपर्क साधला असता, आम्‍ही आता लवकरच चौकशी सुरू करणार असून या चाैकशीत जर शेटकर हा दोषी सापडल्‍यास त्‍याच्‍यावर याेग्‍य ती कारवाई केली जाईल, असे त्‍यांनी सांगितले. सध्‍या शेटकर याला पालिकेने निलंबित केले आहे. ही घटना होऊन जवळपास दीड महिना होत आला तरी ही चाैकशी प्राथमिक अवस्‍थेतच रेंगाळत पडली आहे.

पालिकेकडून दिरंगाई

१७ लाखांचा गंडा बसूनही त्‍या कारकुनाच्‍या बाबतीत अंतर्गत चौकशी करण्‍यासाठी मडगाव पालिकेकडूनही दिरंगाई होत असल्‍याचे दिसून आले आहे. या कारकुनाबाबत चाैकशी समिती बसवून चौकशी करण्‍यासाठी पालिका मुख्‍याधिकारी गाैरीश शंखवाळकर यांनी मंगळवार, २३ जुलै राेजी अंतर्गत नोट जारी केल्‍याची माहिती प्राप्‍त झाली.

मडगाव पालिकेत कारकुनाने १७ लाखांचा अपहार केलेला असतानाही पालिकेने त्‍याच्‍याविरोधात पोलिसांत तक्रार देण्‍यातच धन्‍यता मानलेली आहे. दुसऱ्या बाजूने संशयित सापडत नाही, असे म्‍हणत पाेलिसही हाताची घडी घालून गप्‍प बसले आहेत. वास्‍तविक कुठलाही संशयित दीर्घकाळ फरार असला तर त्‍याच्‍याविराेधात लुक आऊट नोटीस जारी करून ती सार्वजनिक स्‍थळावर लावली जाते; पण योगेश शेटकरच्‍या बाबतीत ही कारवाई न करण्‍याइतपत मडगाव पोलिस मवाळ झाले आहेत, असे वाटते.
सावियो कुतिन्‍हो, निमंत्रक शॅडो कौन्‍सिल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT