Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: गोव्यात नोकरी शोधायला येताना सोबत आणला गांजा; उत्तर प्रदेशच्या तरुणाला अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी

Goa Crime News: गांजा प्रकरणी मडगाव पोलिसांनी अटक केलेल्या ओमप्रकाश पार्सिया हा रोजगाराच्या शोधात गोव्यात आला होता व येताना त्याने उत्तर प्रदेशातून सोबत गांजाही आणला होता, असे पोलिस तपासात उघड झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: गांजा प्रकरणी मडगाव पोलिसांनी अटक केलेल्या ओमप्रकाश पार्सिया हा रोजगाराच्या शोधात गोव्यात आला होता व येताना त्याने उत्तर प्रदेशातून सोबत गांजाही आणला होता, असे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिस कोठडीची त्याची मुदत शुक्रवारी संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात उभे केले असता न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली.

१० रोजी ओमप्रकाशला येथील ओल्ड स्टेशन रोड येथे पोलिसांनी पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३०४ ग्राम गांजा सापडला होता. त्याची किंमत ३० हजार ४०० रुपये इतकी होती. नंतर त्याला अधिक तपासासाठी तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. गांजा कुठून आणला होता याची माहिती त्याच्याकडून पोलिसांनी वदवून घेतली.

त्यावेळी त्याने उत्तर प्रदेश राज्यातून हा गांजा आणल्याची कबुली दिली. तो रोजगाराच्या शोधात गोव्यात आला होता. येथे त्याचे दोन मित्र आहेत. त्यांच्या मदतीने येथे काम मिळेल म्हणून तो आला होता. गांजा विकल्यास पैसेही मिळेल म्हणून त्याने येताना सोबत गांजाही आणला होता. मात्र तो पोलिसांच्या तावडीत सापडला व गजाआड झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT