
Vasco Akkalkot Bus Service
वास्को: धार्मिक पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेउन कदंब महामंडळाने वास्को ते अक्कलकोट-महाराष्ट्र दरम्यान थेट बससेवा सुरू केली आहे. गुरुवारी सायंकाळी परिवहन मंत्री माविन गुदिन्हो यांच्या उपस्थितीत या सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आमदार कृष्णा साळकर, कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर, उपाध्यक्ष क्रीतेश गावकर, सांकवाळ जि. प. सदस्या अनिता थोरात, नगरसेवक शमी साळकर आदी उपस्थित होते.
गुदिन्हो म्हणाले की, कदंब महामंडळाने जनतेची सेवा करण्याच्या वचनबद्धतेवर भर दिला आहे. कोविड काळात असो किंवा सध्या सुरू असलेले सेंट फ्रान्सिस झेवियर प्रदर्शन असो कदंबने आपली जबाबदारी पार पाडली आहे.
अक्कलकोट ते गोवा दरम्यानची थेट बस सेवेची दीर्घकाळापासूनची भाविकांची मागणीही आज पूर्ण होत आहे. आमदार कृष्णा साळकर यांनी या नवीन सेवेसाठी केवळ वास्कोतूनच नव्हे तर संपूर्ण गोव्यातून मागणी होती. स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांना याचा मोठा फायदा होईल. उल्हास तुयेकर यांनी या सेवेबाबत माहिती दिली.
वालांकणी तसेच तिरुपतीला थेट बससेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे. सरकार ही मागणी देखील लवकर पूर्ण करणार. जेणेकरून लोकांचा विश्वास आणि भक्ती सुनिश्चित होईल, असे गुदिन्हो यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.