Old Market Garage in Margao, Vehicles in Garage Dainik Gomantak
गोवा

Margao: मडगाव जुन्या मार्केटमध्ये विनावापर वाहनांची गर्दी! चालू वाहनांसाठी जागेची कमतरता, जागा स्वच्छ करण्याची होतेय मागणी

Margao Municipal Coucil: कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, त्यांनी ही वाहने भंगारात काढण्यासाठी निविदा जाहीर केली होती.

Sameer Panditrao

सासष्टी: मडगाव नगरपालिकेच्या जुन्या मार्केटमध्ये गॅरेज आहे. गॅरेजच्या परिसरात आणखी वाहने ठेवण्यास जागा नाही. याचे कारण म्हणजे कमीत कमी दहा तरी मोठे ट्रक, टॅंकर, लहान रिक्षा वापराविना ठेवलेल्या आहेत व ही सर्व वाहने निकामी झाली आहेत. ही सर्व वाहने भंगारात काढून जागा स्वच्छ करावी, अशी मागणी या भागातील नगरसेवक वितोरीन फर्नांडिस यांनी केली आहे.

काही वाहने वेली चढल्याने लपली आहेत. पावसात ही परिस्थिती भयावह होण्याची शक्यता आलुलिया फर्नांडिस या नागरिकाने व्यक्त केली. दरम्यान, नगरपालिकेने ही वाहने भंगारात काढण्यासाठी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाकडे संपर्क साधल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, कित्येक महिने झाले तरी महामंडळाने त्यासाठी काहीच पाऊल उचलले नाही. नगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, सरकारच्या आदेशानुसार आम्ही गोवा कचरा व्यवस्थापन मंहामंडळाकडे यासंदर्भात प्रस्ताव मांडला होता.

कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, त्यांनी ही वाहने भंगारात काढण्यासाठी निविदा जाहीर केली होती; पण एकच बोलीदार आल्याने त्याचे पुढे काहीच झाले नाही. आता महामंडळाने त्या एकाच बोलीदाराला ही वाहने भंगारात काढण्याचे कंत्राट देण्याचे ठरविले आहे. मात्र, त्यासाठी सरकारी मान्यता आवश्यक आहे. सरकारची मान्यता आल्यावर प्रक्रिया सुरू केली जाईल. मात्र, दहापैकी केवळ पाच वाहनांचेच कंत्राट दिले जाणार आहे, अशी माहिती मिळाली.

इलेक्ट्रिक रिक्षाही गंजल्या

मडगाव नगरपालिकेच्या जुन्या गॅरेजमध्ये असलेली सर्व वाहने बिनकामाची झाल्यामुळे व दुरुस्त करणेही कठीण असल्याने ती भंगारात काढणे, हा यावर एकच उपाय आहे. या वाहनांची देखरेख, नियमित दुरुस्ती होत नाही. दोन इलेक्ट्रिक रिक्षा रस्ते स्वच्छ करण्यासाठी आणल्या होत्या. आता या रिक्षाच स्वच्छ करण्याची वेळ नगरपालिकेवर आली आहे, असे नगरसेवक फर्नांडिस यांनी सांगितले.

वितोरीन फर्नांडिस, नगरसेवक

मडगाव नगरपालिकेच्या जुन्या गॅरेजमध्ये पूर्वी कचरावाहू ट्रक, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांची वाहने ठेवली जात असत. पूर्वी पालिकेकडे टॅंकर होते. या टँकरद्वारे शहरभरातील रस्त्यावर पाण्याचे फवारे मारण्याचे काम करीत. सकाळच्या वेळी कचरावाहू ट्रक नेण्यासाठी येणारे चालक येथे असतात ते नंतर सायंकाळी ट्रक ठेवण्यासाठी येतात. आपण कित्येकवेळा ही बाब नगराध्यक्षांच्या नजरेस आणून दिली आहे. मात्र, त्यावर काहीही उपाययोजना आखली गेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT