Margao: मडगाव पालिकेला लाखो रुपयांचा फटका! पेट्रोल पंप भाडेकराराचे नूतनीकरण करण्याची गरज; 83 लाख थकबाकी

Margao Municipal Revenue: पालिका कायद्याच्या ८८(३) कलमानुसार पालिकेला आपली स्थावर मालमत्ता तीन वर्षांसाठी भाडेपट्टीवर देता येते.
Petrol Pump
Petrol PumpDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सासष्टी: मडगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी पालिकेच्या मालकीच्या जागेत चार ते पाच पेट्रोल पंप आहेत. पालिकेने ही जागा भाडेपट्टीवर दिली आहे, मात्र भाडेपट्टी कराराचे नूतनीकरण न केल्याने पालिकेला लाखो रुपयांचा महसूलाला मुकावे लागत असल्याचे २०२३-२४ सालच्या ऑडिट अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या भाडेपट्टी कराराचे नूतनीकरण करण्याची सूचना या अहवालात करण्यात आल्याचे कळते.

पालिकेची अंतर्गत नियंत्रण यंत्रणा कमजोर झाल्याचे अहवालात म्हटले आहे. पालिका कायद्याच्या ८८(३) कलमानुसार पालिकेला आपली स्थावर मालमत्ता तीन वर्षांसाठी भाडेपट्टीवर देता येते. पालिका प्रशासन संचालनालयाच्या मान्यतेने त्यात वाढही करता येते. पण पालिकेने चारपैकी केवळ दोन पेट्रोल पंपांकडे भाडेपट्टी करार केला आहे. बाकी दोन पेट्रोल पंप करार नसताना कार्यरत आहेत. त्यामुळे पालिकेला लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे.

Petrol Pump
Margao Municipality: मडगाव पालिकेत आर्थिक गडबडी! लेखा संचालनालयाच्या ऑडिटमधून धक्कादायक बाब उघड

जानेवारी २०१० पासून पेट्रोल पंपाच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला. एका पेट्रोल पंपाला १ नोव्हेंबर २०२० ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत ३६.१२ लाख रुपये भरण्याचा आदेश दिला. मात्र अजून ही रक्कम भरण्यात आलेली नाही व पेट्रोल पंप मात्र कार्यरत आहे. दोन पेट्रोल पंपाकडून अनुक्रमे ३३.४८ व ५०.५० लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्याचे प्रयत्न झालेले दिसत नाहीत.

Petrol Pump
Margao: गाडी सुटली म्हणून धावत आले आणि रेल्वेखाली सापडले; मडगावातील व्यावसायिकाचा मृत्यू; कारवार स्थानकावरील दुर्दैवी घटना

८३.९८ लाख थकबाकी

२०११ पासून अधिकृत करार केलेला नसताना पेट्रोल पंपांकडून भाडे घेतले जात आहे. हे भाडे लागू दरा पेक्षा ६० टक्के कमी असल्याने पालिकेला ८३.९८ लाख रुपये थकबाकी येणे बाकी आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. एवढी थकबाकी असूनही पालिकेने या पेट्रोल पंपांना हटविण्यासाठी कोणताही प्रयत्न केलेला दिसत नाही, असेही अहवालात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa CZMP 2019 Kushavati District
Kodli Iron Ore Mining Project
Margao Stray Dogs Survey
E20 Petrol Problems Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com