Margao: ..अन्यथा कर भरणार नाही! करवाढीविरुद्ध मडगाववासीय आक्रमक; नागरिकांकडून पालिकेचा निषेध

Margao Protest Against Tax Hike: काँग्रेसचे मडगावचे नेते सावियो कुतिन्हो यांनी ही करवाढ पालिका जरी २० टक्के असल्याचा दावा करीत असली तरी प्रत्यक्षात ती ६६ टक्के आहे, असे सांगितले.
Margao Municipality Tax Hike
Margao Municipality Tax HikeDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: पालिकेने जी भरमसाट करवाढ केली आहे, ती मागे घ्यावी अन्यथा करदाते कर भरणार नसल्याचा सज्जड इशारा या करवाढीच्या निर्णयाच्या निषेधार्थ एकत्र आलेल्या जागृत नागरिकांनी दिला आहे.  शुक्रवारी पालिका इमारतीसमोर नागरिकांनी एकत्र येऊन पालिकेच्या निर्णयाला विरोध केला. 

निर्णय मागे न घेतल्यास पुढच्या पालिका निवडणुकीत मतदार या पालिका सदस्यांना धडा शिकवतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. काँग्रेसचे मडगावचे नेते सावियो कुतिन्हो यांनी ही करवाढ पालिका जरी कमीत कमी २० टक्के असल्याचा दावा करीत असली तरी प्रत्यक्षात ती ६६ टक्के आहे, असे सांगितले.

नगराध्यक्ष स्वतः कबूल करतात की, ४५ टक्के आस्थापनांकडून महसूल येणे बाकी आहे. जीआय व मडगाव पालिकेचे बाजार निरीक्षक सध्या सर्वेक्षण करीत आहेत. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. 

Margao Municipality Tax Hike
Margao: मडगाव पालिकेला लाखो रुपयांचा फटका! पेट्रोल पंप भाडेकराराचे नूतनीकरण करण्याची गरज; 83 लाख थकबाकी

गोवा फॉरवर्ड पार्टीचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर म्हणाले की, पालिका ही  लोकसेवेसाठी असते, मात्र सध्या असे वाटते की लोकांना त्रास करण्यासाठी ती आहे. सध्या मडगाव पालिका धरून देशात व राज्यात तीन इंजिन सरकार आहे.  जे कायदेशीरपणे आपले काम करतात त्यांना त्रास दिला जातो, मात्र सध्या मडगावात जे विना परवाना आपला व्यवसाय करतात त्यांना अभय दिले जाते. मतदार पुढच्या पालिका निवडणुकीत अशा मुजोर पालिका मंडळाला धडा शिकवणार, असे ते म्हणाले. 

Margao Municipality Tax Hike
Margao City Guide: 'होली स्पिरिट चर्च, ऐतिहासिक वास्तू आणि बरंच काही'... फक्त 24 तासांत मडगाव कसं 'एक्सप्लोर' कराल?

नगरसेवक बार्रेटो यांचाही विरोध

दरम्यान, भाजपचे नगरसेवक कामिल बार्रेटो यांनीही या करवाढीला विरोध दर्शविला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी दहा टक्के करवाढ ठीक आहे असे सांगताना, लहान घटकांना व्यवसाय करणेही मुश्कील होणार असल्याचे ते म्हणाले. यावर पालिकेने फेरविचार करावा असे त्यांनी सांगितले. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com