Margao New Market Traders Dispute Dainik Gomantak
गोवा

Margao New Market: मडगाव न्यू मार्केटच्या व्यापाऱ्यांत दुफळी, नवीन असोसिएशनची स्थापना; जुन्या संघटनेचे नोंदणीचे संकेत

Margao New Market Division: मार्केटमध्ये अनेक समस्या आहेत. त्यात पाण्याची टाकी, पार्किंग, फुटपाथ वरील अतिक्रमण सारख्या समस्यांचा समावेश आहे.

Sameer Panditrao

सासष्टी: मडगाव न्यू मार्केटमधील व्यापाऱ्यांमध्ये दुफळी माजल्याचे आज उघड झाले. गोपाळ नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मडगाव न्यू मार्केट ट्रेडर्स असोसिएशन अस्तित्वात असताना मार्केटमधील व्यापारी दामोदर घोडे यांनी न्यू मार्केट ट्रेडर्स असोसिएशनची स्थापना केल्याचे आज जाहीर केले.

आम्ही मार्केटमधील सर्व युवा व्यापारी एकत्र आलो असून ही नवीन संघटना स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले.न्यू मार्केटमधील ज्येष्ठ व्यापारी व संघटनेचे माजी अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी सांगितले की हल्लीच उच्च न्यायालयाने संघटनेची जुनी समिती विसर्जित केली आहे व सब रजिस्ट्रारने (उपनिबंधक) त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

अजून नव्या समितीची कार्यकारी समिती नियुक्त केली नसून आपण स्वता तसेच अमित गुलानी, राजेंद्र आजगावकर, रामा बी नाईक, गोविंद घोडे, अरविंद मोसानी ही सद्या सल्लागार म्हणुन काम पहात आहेत, असे शिरोडकर यांनी सांगितले.

सध्या मार्केटमध्ये अनेक समस्या आहेत. त्यात पाण्याची टाकी, पार्किंग, फुटपाथ वरील अतिक्रमण सारख्या समस्यांचा समावेश आहे.

या संदर्भात मडगाव न्यू मार्केट ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळ नाईक यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्याने सांगितले की विनोद शिरोडकर २०१३ पासून संघटनेचे कोणीच नव्हते. तेव्हापासून ते स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून वावरत होते. मार्केटमधील आणखी एक व्यापारी देवी बोरकर यांची आणखी ही व्यापारी संघटना होती व त्यांनी शिरोडकर यांच्या विरोधात उच्च न्यायालयात अफरातफर व इतर काही गोष्टी विरोधात २०१२ मध्ये तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने निकाल देवी बोरकर यांच्या बाजूने दिला होता. तेव्हापासून विनोद शिरोडकर संघटनेचे कोणीच नव्हते, असे गोपाळ नाईक याने सांगितले.

आमच्या संघटनेची नोंदणी लवकरच; नाईक

न्यू मार्केट ट्रेडर्स असोसिएशनच्या संघटनेच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. आमची मडगाव न्यू मार्केट ट्रेडर्स असोसिएशन ही संघटना मूळची आहे व नोंदणीसाठी सर्व कागदपत्रे सब रजिस्ट्रारच्या कचेरीत दिली आहेत. आमच्या संघटनेची रितसर नोंदणी लवकरच होणार असल्याचे गोपाळ नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

Imran Khan: भारतीय दिग्गजांचा पाकिस्तानला 'बाऊन्सर'! इम्रान खानच्या मदतीला धावले कपिल देव अन् सुनिल गावस्कर; सरकारकडे केल्या 'या' 3 मागण्या

Firing Video: रक्ताचा खेळ! LIVE सामन्यात अंदाधुंद गोळीबार, अनेकांचा जागीच मृत्यू; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

Donald Trump: "मी राष्ट्राध्यक्ष व्हावं असं त्याला वाटत नव्हतं..." अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या एपस्टीनसोबतच्या मैत्रीवर ट्रम्प बोलले

SCROLL FOR NEXT