Margao New Market: 'मडगाव न्‍यू मार्केट' दयनीय स्‍थितीत! अतिक्रमणाचा विळखा; वारंवार आग लागण्‍याचे प्रकारही वाढले

Margao Encroachment Problem: मडगाव नगरपालिका न्यू मार्केट ही व्यापारासाठीची प्रमुख जागा आहे. मात्र सध्‍या या न्यू मार्केटची स्थिती दयनीय झाली आहे.
Margao New Market: 'मडगाव न्‍यू मार्केट' दयनीय स्‍थितीत! अतिक्रमणे वाढली; वारंवार आग लागण्‍याचे प्रकार
Margao New MarketDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: मडगाव हे दक्षिण गोव्यातील प्रमुख व्यापारी केंद्र आहे. सासष्टी तालुक्‍यातील सर्व भागातील लोक येथे खरेदी-विक्रीसाठी येतात. मडगाव नगरपालिका न्यू मार्केट ही व्यापारासाठीची प्रमुख जागा आहे. मात्र सध्‍या या न्यू मार्केटची स्थिती दयनीय झाली आहे. रस्त्यावर व मार्केटमध्‍ये अतिक्रमणे खूपच वाढली आहेत. तेथे फिरायलासुद्धा जागा शिल्लक राहिलेली नाही. त्‍यामुळे लोकांना त्रास होतोय.

या मार्केटमध्ये पाचशे ते साडेपाचशे लहान-मोठे व्यापारी असून पाणी, वीजपुरवठ्याची गंभीर समस्‍या आहे. अधूनमधून तेथे आग लागण्‍याच्‍या घटना घडतात व ती विझविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. मार्केटची इमारतसुद्धा जुनी झाली असून भिंती कधी कोसळतील याची शाश्‍‍वती नाही. या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण? असा प्रश्‍‍न बाजारकरच आता विचारू लागले आहेत.

मडगाव न्यू मार्केट व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष विनोद शिरोडकर व विद्यमान अध्यक्ष गोपाळ नाईक यांची मागणी आहे की, येथे हायड्रंट आहेत पण पाण्याची टाकी नसल्याने त्याचा काहीच उपयोग नाही. विजेच्या तारा लोंबकळत आहेत. मार्केटमधील प्रत्येक व्यापारी व ग्राहक (Customer) आपला जीव मुठीत धरून वावरत आहे.

Margao New Market: 'मडगाव न्‍यू मार्केट' दयनीय स्‍थितीत! अतिक्रमणे वाढली; वारंवार आग लागण्‍याचे प्रकार
Margao New Market Building : पावसाळ्यापूर्वी न्यू मार्केट इमारतीची दुरुस्ती करावी

अलीकडेच लागलेल्‍या आगीच्‍या घटनेनंतर संबंधित खात्यांच्‍या अधिकाऱ्यांनी पाहणी केली व मोठ-मोठी आश्‍‍वासने दिली. मात्र अजून त्यावर उपाययोजना करण्यात आलेली नाही, असे विनोद शिरोडकर यांनी सांगितले. संतोष रायतुरकर नगराध्यक्ष असताना हायड्रंट बसविण्यात आले होते. पण पाण्याची टाकी नसल्याने त्याचा काहीच उपयोग नाही.

जुने रेल्वेस्टेशन रस्‍त्‍यावर पहाटेच बाजार

मडगाव न्यू मार्केट व्यापारी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष गोपाळ नाईक यांनी पाण्याच्या टाकीची व पार्किंग व्यवस्थेची मागणी करतानाच रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची सूचना केली. आम्ही वेळोवेळी या सर्व गोष्टी नगराध्यक्षांना लेखी स्वरूपात कळविल्या आहेत. आमदाराशी चर्चासुद्धा केली आहे. आमचा पाठपुरावा सुरू आहे. पिंपळकट्टा ते जुने रेल्वेस्टेशनापर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमणे वाढली आहेत. संध्याकाळी सातनंतर गांधी मार्केटमधील (Market) विक्रेते या रस्त्यावर बसून भाजी, फळे विकतात. त्‍यामुळे तेथून चालण्‍यासाठी वाटही मिळत नाही. पहाटे ४ वाजताही रस्त्यावर विक्री सुरू असते. बाहेर राज्यातील विक्रेते रात्री ९ वाजताच आपले ट्रक आणून रस्त्यावर ठेवतात. कधीकधी सकाळी आठनंतरही हे विक्रेते रस्त्यावर ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे पार्किंगची समस्‍या निर्माण होते, असेही नाईक यांनी सांगितले.

Margao New Market: 'मडगाव न्‍यू मार्केट' दयनीय स्‍थितीत! अतिक्रमणे वाढली; वारंवार आग लागण्‍याचे प्रकार
New Margao Market : केवळ पाहणी, अहवाल करून काय साध्य होणार?

मी ३४ वर्षे व्यापारी संघटनेचा अध्यक्ष होतो. पण राजकीय दबावापोटी काहीच केले जात नाही ही शोकांतिका आहे. मार्केट परिसरात ज्या नव्या इमारती उभारल्या आहेत, त्यांना पार्किंगची व्यवस्था नाही. फुटपाथ व रस्त्यांवरील अतिक्रमणे रोखण्यास पालिका अपयशी ठरली आहे.

- विनोद शिरोडकर (माजी अध्यक्ष-मडगाव न्यू मार्केट व्यापारी संघटना)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com