Vijai Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Margao Municipality Recruitment Scam: मडगाव नगरपालिकेत 'नातेवाईक' भरती? 11 जागा परस्पर भरल्याचा आमदार सरदेसाईंचा खळबळजनक आरोप; सरकारला धरले धारेवर

Vijai Sardesai On Margao Municipality Recruitment Scam: मडगाव हे आता गाड्यांचे शहर झाले आहेत. जागा दिसली की घाल गाडा असे सुरू आहे. मडगाव नगरपालिकेने कनिष्ठ लिपिकाच्या ११ जागा परस्पर भरून टाकल्या आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्य सरकारने नवा प्रादेशिक आराखडा तयार करावा. अन्यथा नगर व ग्राम नियोजन खात्याचे नाव विभाग बदल व तांत्रिक मंजुरी खाते असे करावे, अशी खोचक सूचना फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत बोलताना केली.

आरोग्य, नगर नियोजन, अन्न व औषध प्रशासन, नगरविकास, वन, महिला व‌ बालकल्याण या खात्यांच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेवेळी ते बोलत होते. सरदेसाई म्हणाले, प्रादेशिक आराखडा नसताना नियोजन कशाच्या आधारे करणार. प्रकल्पांमुळे रस्ते सांडपाणी निचरा व्यवस्था वीज पेयजल यावर किती ताण येईल याचा अभ्यास केला पाहिजे. एकात्मिक शहरे विकास केला पाहिजे. विकास हवा पण त्यासाठी लागणाऱ्या सुविधा हे आधी विकसित केल्या पाहिजेत.

मडगाव येथील दक्षिण गोवा (South Goa) नियोजन व विकास प्राधिकरणाच्या मार्केटमध्ये माशांमधील फॉर्मेलीन तपासण्यासाठी ची प्रयोगशाळा कधी सुरू करणार अशी विचारणा करून ते म्हणाले, मडगाव हे आता गाड्यांचे शहर झाले आहेत. जागा दिसली की घाल गाडा असे सुरू आहे. मडगाव नगरपालिकेने कनिष्ठ लिपिकाच्या ११ जागा परस्पर भरून टाकल्या आहेत. नगरसेवकांनी आपल्या मुली आपले नातेवाईक यांना त्या जागा दिल्या आहेत.

आरोग्य खात्यात तब्बल १ हजार २८१ पदे रिक्त आहेत. मंजूर पदांपेक्षा २९ टक्के पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम कामगिरीवर होत आहे. यास मुळे केवळ जिल्हा इस्पितळातून वर्षभरात ११ हजार रुग्ण गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठवण्यात आले आहेत. याशिवाय राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, कुटीर रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय यातून गोमेकॉत रुग्ण पाठवण्यात आले आहेत.

प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे ही बा.‌ भ. बोरकर यांची कविता उधृत करत पर्यावरण ऱ्हास करणाऱ्या मोठ्या प्रकल्पांचा फेरविचार करावा, अशी मागणी केली. ते म्हणाले सुवर्ण गोवा हरवत चालला आहे. प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांच्या पारंपरिक पायवाटा बंद केल्या जात आहेत त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

पेडणेतील भूरूपांतराकडे वेधले लक्ष

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी गोमेकॉशी सलग्न तुरे इस्पितळात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११, परिचारिकांची ७८, बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांची ७७ पदे रिक्त असल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले दोन रुग्णवाहिकांसाठी एकच चालक आहे. पेडणे तालुक्यात दोन लाख छत्तीस हजार चौरस मीटर भूरूपांतर झाले आहे. ही जमीन कोणाची हे कोणासही माहीत नाही. आश्वे मात्र येथे हॉटेल साठी ५० हजार चौरस मीटर जमीन रूपांतरित करून तेथे रस्ते करणे सुरू झाले आहे. चोपडे येथे १०० व्हिला व चारशे खोल्यांचे पंचतारांकित हॉटेल बांधले जात आहे. यामुळे स्थानिकांत घबराट आहे. डोंगरावर फार्म हाऊस बांधण्यासाठी परवानग्या दिल्या जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT