Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Margao Municipality: या सरकारला नगराध्यक्ष निवडून नाही पसंतीचा हवा आहे

मडगाव नगराध्यक्ष निवड हात दाखवून करण्यासाठी वटहुकूम प्रसारित

Sumit Tambekar

मडगाव: मडगाव पालिकेत आपल्याला हवा तोच नगराध्यक्ष खुर्चीवर बसावा यासाठी सरकार पुन्हा रडीचा डाव खेळत आहे. नगरपालिका अध्यक्ष निवडताना मतदान गुप्त रितीने घेण्याऐवजी हात वर करून खुल्या रितीने व्हावे यासाठी वटहुकूम जारी करण्याच्या तयारीत सरकार आहे. त्यासाठी तयार केलेला मसुदा प्रसारित (बाय सर्क्यूलेशन) पद्धतीने संमत करण्यासाठी रात्रीच सर्व मंत्र्याच्या घरी पाठवून देण्यात आला आहे.

( Margao Municipality mayor election vijai sardesai alleged on Bjp)

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी रात्री उशिरा त्याचा भांडाफोड करताना, ज्या दसऱ्याच्या दिवशी सत्याने असत्यावर मात करायची असते त्याच दसऱ्याच्या पूर्वसंध्येस हे सरकार असत्याचा आधार घेऊन सत्यावर विजय मिळविण्याचा लाजिरवाणा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.

नगरपालिका कायद्याप्रमाणे नगराध्यक्ष निवड ही गुप्त मतदानाने करणे अनिवार्य आहे. याच पद्धतीने मडगाव पालिकेत मतदान घेतल्यावर गोवा फॉरवर्ड पुरस्कृत उमेदवार घनःश्याम शिरोडकर यांनी भाजप पुरस्कृत दामोदर शिरोडकर यांच्यावर 15 -10 अशा फरकाने विजय मिळविला होता. पुढच्या आठवड्यात मडगाव नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी पुन्हा निवडणुक होणार असून पून्हाही तसेच घडू शकते अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच या वटहुकूमाद्वारे सरकार कायदाच बदलू पाहत आहे.

वास्तविक असे वटहुकूम मंत्रिमंडळाची बैठक घेऊन संमत करायचे असतात पण सरकारकडे त्याला वेळ नसल्याने बाय सर्क्यूलेशन (मसूदा मंत्र्यांच्या घरी पाठवून) सरकार ही प्रक्रिया आज रात्रीच पूर्ण करू पाहत आहे.

यावर टीका करताना सरदेसाई यांनी या सरकारला नगराध्यक्ष निवडून आणायला नको तर आपल्या पसंतीचा नियुक्त करायचा आहे हा आरोप मी करत होतो तो खरा होता हे सिद्ध झाले आहे. आज दिगंबर कामत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नगरपालिका संदर्भात आम्ही सगळं जागेवर घालू असे म्हटले होते. त्यांना अशा बेकायदेशीर पद्धतीने हे जागेवर घालायचे आहे का असा सवाल त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai - Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट, मुख्य बोगदा १५ दिवस राहणार बंद

Bhopal Goa Flight: भोपाळ ते गोवा थेट विमानसेवा! पहिल्यांदाच 180 आसनी क्षमतेचे बोईंग प्रवाशांच्या सेवेत

IPL Auction: 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पडला पैशांचा पाऊस, RR च्या ताफ्यात सामील; संजूच्या नेतृत्वाखाली करणार गर्दा!

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

SCROLL FOR NEXT