Margao Municipality 
गोवा

कौतुकास्पद! मुख्यमंत्री यांच्यानंतर मडगावच्या नगराध्‍यक्ष शिरोडकरांकडून अवयवदानाचा निर्णय

मडगावात झालेल्या सोहळ्‍यात घोषणा : आमदार दिगंबर कामत यांच्‍याकडून कौतुक

सुशांत कुंकळयेकर

Margao Municipality: मडगाव पालिकेचे नगराध्‍यक्ष दामोदर शिरोडकर यांनी अवयवदानाची घोषणा करताना आपले मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुफ्‍फुसेण आतडे, स्‍वादुपिंड तसेच डोळे, हाड, हार्ट व्‍हाल्‍व्‍ह, त्‍वचा, कार्टिलेज, रक्‍तवाहिन्‍या दान करणार असल्‍याचे सांगितले आहे. यासंदर्भात आपण गोमेकॉत आवश्‍‍यक प्रक्रिया पूर्ण केली असल्‍याची माहिती त्‍यांनी दिली.

नगराध्‍यक्ष शिरोडकर यांनी आपला वाढदिवस मंगळवारी साजरा केला. यावेळी गुजराती समाज सभागृहात आयोजीत केलेल्‍या कार्यक्रमात ते बोलत होते. मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक, नगरसेवक कामिलो बार्रेटो, स्‍वेता लोटलीकर, दामोदर वरक, माजी नगरसेविका दीपा शिरोडकर व गुजराती समाज स्‍कुलचे अध्‍यक्ष मुकेश सगलानी व अन्‍य उपस्‍थित होते.

नगराध्‍यक्ष शिरोडकर हे मेहनत करुन वर आलेले आहेत व त्‍याच दृष्‍टीकोनातून ते पालिकेचा गाडा हाताळत आले आहेत. त्‍यांनी आपले अवयव दान करण्‍याचा घेतलेला निर्णय स्‍तुत्‍य असून पहिल्‍यांदाच एखाद्या नगराध्‍यक्षानी असा निर्णय घेतला असावा व तो स्‍वागतार्ह आहे, असे आमदार कामत बोलताना म्‍हणाले.

माजी आमदार नाईक यांनी नगराध्‍यक्ष शिरोडकर यांच्‍या अवयवदान करण्‍याच्‍या निर्णयाचे स्‍वागत केले. स्‍वत:चा एखादा अवयव दान करणे हे धाडसाचे काम असते. जरी ते मरणोत्तर असले, तरी तसा निर्णय घेण्‍यास धाडस लागते, असे ते म्‍हणाले.

तसेच नगराध्‍यक्ष म्‍हणून शिरोडकर करत असलेल्‍या कामाची स्‍तुती केली. आपला वाढदिवस पालिकेच्‍या कर्मचार्‍यांनी थाटात साजरा केल्‍याबद्दल नगराध्‍यक्ष शिरोडकर यांनी आभार मानले. यावेळी गुजराती समाज स्‍कूलच्‍या विद्यार्‍थ्‍यांना मिठाई वाटण्‍यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT