Margao New  Gomantak Digital Team
गोवा

Margao News: आगीमुळे मडगाव पालिकेचे पितळ उघडे!

महिना उलटला तरी अग्निशमन कृतियोजना कागदावरच

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव नगरपालिकेच्या सोनसोडोवरील कचरा यार्डातील कचरा व्यवस्थापन शेडीमध्ये या आठवड्यात आगीचा भडका उडाला व त्यातून पालिकेने उच्च न्यायालयात आगप्रतिबंधक उपाययोजनांबाबत दिलेल्या प्रतिज्ञापत्राचे अजूनही पालन झालेले नाही ही बाब स्पष्ट झाली.

उपलब्ध माहितीनुसार, पालिकेने 12 एप्रिल रोजी या उपाययोजनेबाबत हमी दिली होती व ही आग 15 मे रोजी भडकली तेव्हा तेथे ही उपाययोजना नसल्याने अग्निशामक दलाला पाचारण करणे भाग पडले. त्यावेळी पालिकेने सोनसोडो यार्डात विविध ठिकाणी एकूण चार फायर इस्टिंग्वेशर बसविण्याचे मान्य केले होते. पण 15 रोजी जेव्हा आगीचा भडका उडाला तेव्हा तेथे एकही इस्टिंग्वेशर नव्हता.

त्याचप्रमाणे तेथे सहा फायर हॅड्रंटस बसविण्याचे मान्य केले होते. त्यामुळे आग विझविण्यासाठी त्वरित पावले उचलणे शक्य होणार होते. पण तीही व्यवस्था अजूनपर्यंत झाली नसल्याने बंबांना दलाच्या जागेतून पाणी आणावे लागले होते. त्याचप्रमाणे सदर शेडीभोवती योग्य आकाराची एमएस पाईपलाईनची तरतूद करण्याचाही सोनसोडो कृती योजनेत समावेश होता. पण प्रतिज्ञापत्र सादर करून महिना उलटत आला तरी त्याबाबतची हालचाल सुरू झालेली नाही असे दिसून आले.

सोनसोडोवर सुरक्षारक्षक तैनात करा

सोनसोडोवर अजूनही सुरक्षारक्षक तैनात करण्‍यात आलेले नाहीत. मात्र नगरपालिका इमारतीच्या दारात अनेक सुरक्षारक्षक घुटमळताना दिसतात. पालिका अधिकारी याबाबत काहीच बोलायला तयार नाहीत. पण फायर इस्टिंग्वेशरसाठी अजून काही ऑर्डर दिलेली नाही की अग्निशमक व्यवस्थेसाठी खासगी व्यवस्था करण्याबाबत काही हालचाल दिसत नाही. त्यामुळे न्यायालयातील प्रतिज्ञापत्राच्या अवमानप्रकरणात तिला सामोरे जावे लागणार नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Land Scam: मडगावात भूखंड देण्याच्या बहाण्याने 42.50 लाखांची फसवणूक; फातोर्डा येथील एकाविरोधात गुन्हा दाखल

कोंकणा सेन '7 वर्ष लहान' बॉयफ्रेंड सोबत गोव्यात, डेटिंगच्या चर्चांना उधाण; सोशल मीडियावर Photos Viral

Verna Accident: वेर्णा येथे चार वाहनांचा विचित्र अपघात; जिवितहानी टळली

Rama Kankonkar Assault: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर सहाजणांकडून जीवघेणा हल्ला; हल्लेखोर फरार

घटस्थापनेला नवनिर्वाचित समितीकडे पदभार, 'GCA'च्या नव्या पदाधिकाऱ्यांकडून विकासाची अपेक्षा

SCROLL FOR NEXT