Book
BookDainik Gomantak

Book Prices Hike : वह्या-पुस्‍तकांच्‍या दरात वाढ

पालकांचे ‘गणित’ कोलमडले : 20 ते 30 टक्क्यांनी वाढल्‍या किमती

सासष्टी: यंदाच्या शैक्षणिक वर्षात पाठ्यपुस्तके व वह्यांच्या दरामध्ये भरमसाट वाढ झाल्याने पालकांच्या खिशाला मोठा भूर्दंड पडणार आहे. पाठ्यपुस्तकांच्‍या किमती 20 ते 30 टक्क्यांनी वाढल्‍या आहेत. इयत्ता नववीतील पुस्तकांच्या संचाला 770 रुपये, दहावीच्या पुस्तक संचाला 955 रुपये, बारावीच्या पुस्तक संचाला 1300 ते 1400 रुपये मोजावे लागतील, असे मडगावमधील एका पुस्तकविक्रेत्‍याने सांगितले. नववीचे इतिहासाचे पुस्तक अजूनही बाजारात उपलब्ध झालेले नाही.

इयत्ता नववी ते बारावीची पुस्तके छापण्याचे कंत्राट गोवा शालान्‍त मंडळाने दिल्ली येथील होली फेथ इंटरनॅशनल कंपनीला दिले आहे. या कंपनीचे प्रतिनिधी विजय पुजारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जवळजवळ 80 ते 85 टक्के पुस्तके उपलब्ध आहेत. मार्च 2023 पासून आम्ही पुस्तकविक्रेत्यांना पुस्तके त्यांच्या ऑर्डरप्रमाणे दिली आहेत. गोवा शालान्‍त मंडळाने अजून नववीच्या इतिहास पुस्तकाच्या छपाईची मंजुरी दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Book
Panaji Bus stand : पणजी बसस्थानक,नव्हे समस्यांचे ‘आगर’

पुस्तकांच्या किमतीत गेल्या तीन-चार वर्षांत वाढ झाली नव्हती. मात्र यंदा कागदाच्या किमतीत वाढ झाल्याने पुस्तकांच्या किमतीतही किरकोळ वाढ झाल्याचे पुजारी यांनी सांगितले. ऑर्डर केलेल्या पुस्तकांपेक्षा कमी पुस्तके दिल्याचे काही पुस्तकविक्रेत्यांनी सांगितले. गोव्यात पहिली ती आठवी इयत्तेची पुस्तके तयार करण्याची जबाबदारी स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲण्‍ड ट्रेनिंगची (एससीईआरटी) आहे. त्यांनी ही पुस्तके छापण्याचे कंत्राट कोल्हापूर येथील शिवम ऑफसेटला दिले आहे.

Book
Sagar Parikrama: केंद्रीय मंत्री रूपाला यांनी वास्को जेट्टीची घेतली दखल; 'सागर परिक्रमा' यात्रा गोव्यात दाखल

100 पानी वही 28 रु. तर 200 पानी वही 45 रु.

सरकार अनुदानीत शाळांना पहिली ती आठवीपर्यंतची पुस्तके मोफत दिली जातात. त्यामुळे या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पुस्तकांसाठी वणवण करावी लागणार नाही. वह्यांच्या किमतीतही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी100 व 200 पानी वहीची किंमत अनुक्रमे 25 व 40 रुपये होती. यंदा 100 पानी वही 28 रुपये व 200 पानी वही 45 रुपये एवढी झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com