Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Margao Municipal Council: मडगावला 'पूर्णवेळ मुख्याधिकारी' हवाच; आमदार दिगंबर कामत

Digambar Kamat: सर्वसाधारण बदल्या होणार तेव्हा पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्ती होईल असे आमदार दिगंबर कामत यांनी आज पत्रकारांना सांगितले

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: मडगाव नगरपालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी पाहिजे या मताचा मीसुद्धा आहे, पण सध्या समाजकल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर यांच्याकडे अतिरिक्त ताबा दिला आहे व तो तात्पुरता आहे.

जेव्हा सरकारी अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या होणार आहेत, तेव्हा मडगावला पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्ती होईल असे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी आज पत्रकारांना सांगितले.

लोकांची कामे पूर्ण होण्यास दिरंगाई होत असते, लोकांची प्रकरणांवरील सुनावणी पुढे ढकलावी लागते. त्यामुळे लोकांना त्रास होत असतो याची जाणीव आपल्याला आहे. तरीसुद्धा अतिरिक्त ताबा घेतलेले मुख्याधिकारी पंचवा़डकर अनुभवी आहेत.

ते पूर्वी इथे मुख्याधिकारी म्हणून होते. त्यांनी एकाच दिवसात १९८ फाईल हातावेगळ्या केल्या अशी माहिती कामत यांनी दिली.

नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले, की माजी मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी जवळ जवळ ९०० हून अधिक फाईल प्रलंबित ठेवल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT