Margao Municipality
Margao Municipality Dainik Gomantak
गोवा

Margao Municipality: गोवा फॉरवर्ड पार्टी, काँग्रेसला खिंडार; 7 नगरसेवक भाजपमध्ये दाखल

दैनिक गोमन्तक

पणजी: नगरपालिका कायदा दुरुस्तीनंतर काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांना रीतसर भाजपात प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे भाजपने मडगाव नगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा करून घेतला आहे. यावर आता विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे.

(Margao Municipality Congress and Goa Forward party corporators joined BJP)

काँग्रेस आमदारांच्या 14 सप्टेंबरला झालेल्या घाऊक पक्षांतराच्या पार्श्‍वभूमीवर मडगाव नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपला मोठी नामुश्की पत्करावी लागली होती. 16 सप्टेंबर रोजी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष नगरसेवक घनःश्याम शिरोडकर हे गोवा फॉरवर्डचे समर्थक विजय झाले.

निराश आणि अस्वस्थ झालेल्या दिगंबर कामत आणि भाजपने हे पद आपल्याकडे यावे यासाठी आटापिटा सुरू केला आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक गुप्त पद्धतीने न घेता हात वर करून घ्यावी अशी कायदा दुरुस्ती शुक्रवारी 7 ऑक्टोबरला केल्यानंतर आता काँग्रेसचे 6 आणि गोवा फॉरवर्डच्या एका नगरसेवकाला रीतसर भाजपात प्रवेश देऊन आपले संख्याबळ 16 केले आहे. त्यामुळे मडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे. बुधवारी, 12 ऑक्टोबरला नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

यांनी केला भाजप प्रवेश

आज भाजपच्या कार्यालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि दिगंबर कामत यांच्या उपस्थितीत दामोदर शिरोडकर, दामोदर परब, दीपाली सावळ, सिताराम गडेकर, सगुण नाईक, लता पेडणेकर, सेंड्रा फर्नांडिस या काँग्रेस पुरस्कृत नगरसेवकांसह राजू नाईक या गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांनी आज भाजपात प्रवेश केला. 16 सप्टेंबर रोजी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याने आता या नगरसेवकांना रीतसर भाजपात प्रवेश देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Petrol-Diesel Price: राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किंचित बदल; वाचा सविस्तर दर

Jammu and Kashmir: कुलगाममध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्करचा टॉप कमांडर ठार; तीन दहशतवादीही ढेर

Goa Election 2024: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

SCROLL FOR NEXT