Navewade: पाणी मिटर चोरी प्रकरणात एकाला अटक

वास्को पोलिसांनी केली कारवाई
Navewade
Navewade Dainik Gomantak

वास्को: नवेवाडे मुरगाव नगरपालिका प्रभाग 21, 22 मधील नागरीकांच्या घरासमोरील सार्वजनिक बांधकाम पाणी पुरवठा विभागाचे मिटर चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी नवेवाडे हाऊसिंग बोर्ड वसाहतीतील सिद्धू पवार (21) याला अटक केली.

(Sidhu Pawar from Navewade arrested in water meter theft case)

Navewade
Amit Patkar : 'भारत जोडो यात्रे'नंतर भाजपची 'अंतिम यात्रा' सुरु होईल

वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम पाणी विभागाचे मिटर चोरी झाली असल्याची तक्रार पोलिसात नोंद झाली होती. यावेळी पोलिसांनी काही ठिकाणी घरामध्ये लावलेल्या सिसिटिव्हीच्या मदतीने अज्ञात चोरट्याचा शोध घेणे सुरु केले.

Navewade
Vijai Sardesai: 'ही' जाहिरात गोवेकरांची संधी कमी करण्यासाठी?

यात नवेवाडे हाऊसिंग बोर्ड वसाहतीतील व्यक्ती असल्याचे पोलिसांना कळताच, पोलिसांनी सर्व प्रथम संशयिताला पोलिस स्थानकावर बोलावून विचारपूस केली असता त्याने पाण्याचे मिटर चोरी केल्याचे मान्य केले. त्यानुसार वास्को पोलिसांनी पाण्याचे मिटर चोरी प्रकरणी सिद्धू पवार याला अटक केली. पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रोहन नागेशकर पुढील तपास करीत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com