Margao Mugul gangwar, Lawrence Bishnoi Gang Goa  Dainik Gomantak
गोवा

'गोव्यातील साथीदारांच्या वाटेला गेल्यास गाठ माझ्याशी', Instagram वर धमकीचा Video; मुंगूलप्रकरणी बिश्नोई टोळीचा हस्तक रडारवर

Margao Mungul News: मुंगूल टोळीयुद्ध आणि कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई यांचे परस्पर संबंध आता उघड झाले असून, या टोळीचा खास हस्तक असलेला पवन सोळंकी आता गोवा पोलिसांच्या रडारवर आहे.

Sameer Panditrao

मडगाव: मुंगूल टोळीयुद्ध आणि कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई यांचे परस्पर संबंध आता उघड झाले असून, या टोळीचा खास हस्तक असलेला पवन सोळंकी आता गोवा पोलिसांच्या रडारवर आहे.

पवन याची बिश्नोई टोळीचा प्रमुख लॉरेन्स याचा खास हस्तक, अशी गुन्हेगारी विश्वात ओळख आहे. सध्या पोलिसांच्या तावडीत असलेला ओमसा आणि तो दोघेही राजस्थानमधील जल्लोरी या गावचे रहिवासी आहे.

गोव्यात गुन्हेगारी विश्वावरील वर्चस्वासाठी हा पूर्वनियोजित कट रचला होता. १२ ऑगस्ट रोजी टोळीयुद्धाची ही घटना घडली होती. यात वॉल्टर गॅंगचे युवकेश सिंग (२०) आणि रफिक तशान (२४) या दोघांवर हल्ला केला होता. आतापर्यंत याप्रकरणी पोलिसांनी २३ जणांना अटक केली आहे. तसेच यापुढे अन्य काहीजणांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

धमकीचा व्हिडिओ ‘इन्स्टाग्राम’वर

पवन हा समाज माध्यमांवर सक्रिय असून काही महिन्यांपूर्वी ‘आमच्या गोव्यातील साथीदारांच्या वाटेला गेल्यास गाठ माझ्याशी आहे. तुमचे काय होईल ते सांगता येणार नाही’, अशी धमकी देणारा एक व्हिडिओ त्याने ‘इन्स्टाग्राम’वर अपलोड केला होता. ओमसा पोलिसांच्या हाती लागल्याने सध्या पवन हा भूमिगत झाला आहे. पोलिस त्याचा ठावठिकाणा शोधत आहेत.

बिश्नोई टोळीचा हुकमी एक्का पवन

पवन हा बिश्नोई टोळीचा मध्यस्थ म्हणून काम पाहात आहे, असेही पोलिसांना तपासात आढळून आले आहे. टोळीचे सर्व व्यवहार तोच बघत होता. ओमसा हा या टोळीयुद्ध प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अमोघ नाईक याच्या संपर्कात होता. अमोघ आणि वेली हे दोघेही या कारस्थानाचे प्रमुख सूत्रधार आहेत. सध्या ते दोघेही बेपत्ता आहेत. ते राज्याबाहेर पळून गेले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. त्यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही पोलिसांनी जारी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

RO RO Ferry: ..आता मुंबईतून सिंधुदुर्गात पोचणार झटक्यात! रो - रो सेवेची चाचणी; बोटीचे विजयदुर्ग बंदरात आगमन

Goa Water Supply: 'प्रत्येकाला सरासरी 12 तास पाणीपुरवठा करू', मंत्री फळदेसाईंचा दावा; गळती कमी करण्यासाठी ठोस पावले उचलणार

New GST Rates: गोव्‍यातील कॅसिनो उद्योगासाठी धक्‍का! जीएसटी 40 टक्‍के; पर्यटन, इतर व्यवसायांना फटका बसण्याची शक्यता

Usgao Theft: दार तोडले, महिलेच्या तोंडात कोंबला बोळा! पालवाडा-उसगावात चोरांचा धुमाकूळ; 4 लाखांचा ऐवज लंपास

Rashi Bhavishya 04 September 2025: खर्च वाढू शकतो, विद्यार्थ्यांना यशाची संधी; कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT