BJP Goa  Dainik Gomantak
गोवा

Digambar Kamat: सावधान! 'विरोधी नेत्यांचे पोस्ट लाईक करताय?' पक्षाचं तुमच्यावर लक्ष आहे

Margao MLA Digambar Kamat: केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे पोस्ट लाईक करण्याचा सल्ला

Akshata Chhatre

मडगाव: गोव्यातील अनेक महत्वाच्या नेत्यांमध्ये गणल्या जाणाऱ्यांपैकी एक नाव म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत. दिगंबर कामत यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडिया वापरताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी सर्वांना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे पोस्ट लाईक करण्याचा सल्ला दिलाय.

माजी मुख्यमंत्री म्हणालेत की कार्यकर्ते कुठल्या पक्षच्या नेत्यांचे पोस्ट लाईक करतायत पक्ष यावर लक्ष ठेऊन आहे. कार्यकर्त्यांच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवण्यासाठी ते एक विशेष यंत्रणा वापरतायत. आत्ताच्या घडीला कितीही विरोध झाला तरीही भारतीय जनता पक्षाला कोणीही त्यांच्या पदावरून हलवू शकणार नाहीये असेही कामत यांनी नमूद केले.

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी कार्यकर्त्यांना पक्ष किंवा पक्षाच्या नेत्यांवर टीका करणारे सोशल मीडिया संदेश पाठवू नयेत याउलट पक्षाचा संदेश आणि मोहिमांचा प्रचार करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असा संदेश दिला आहे.

कामत यांनी नवनिर्वाचित मडगाव मंडळाचे अध्यक्ष अभिषेक काकोडकर यांनाही पाठिंबा दर्शवला आणि मडगावने सतत उत्तम कामगिरी बजावत राहावी असे आवाहन केले आणि सोबत मंडळाच्या बैठका आणि कार्यक्रमांमध्ये कोणीही टाळाटाळ केल्यास ते खपवून घेणार नाही असा इशाराही दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT