Digambar Kamat: माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना 'मंत्री' करा! कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

Goa Politics: भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्‍याकडे मडगावच्‍या भाजप कार्यकर्‍त्‍यांनी कामत यांना मंत्रिपद द्यावे अशी मागणी केली.
Digambar Kamat News
Digambar KamatDainik Gomantak
Published on
Updated on

Digambar Kamat ministerial post demand

मडगाव: आमदार दिगंबर कामत यांना सध्‍याच्‍या भाजप सरकारात मंत्रिपद देण्‍यात यावे, या मागणीने पुन्‍हा एकदा जोर धरला असून आता त्‍यात मडगावचे भाजप कार्यकर्तेही सामील झाले आहेत.

गुरुवारी भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्‍याकडे मडगावच्‍या भाजप कार्यकर्‍त्‍यांनी कामत यांना मंत्रिपद द्यावे अशी मागणी केली. आपण दिगंबर कामत यांना मंत्रिपद द्यावे, यासंदर्भात केंद्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांकडे बोलणी केली असल्याची माहिती सदानंद शेट तानावडे यांनी दिली असा दावा या कार्यकर्‍त्‍यांनी केला आहे.

Digambar Kamat News
Goa Politics: खरी कुजबुज: बेपत्ता बासुदेव गेला कुठे?

मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे यांच्या नेतृत्वाखाली मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, गोपाळ नाईक, दिगंबर सावळ, नितीन प्रभुदेसाई इत्यादींनी सदानंद शेट तानावडे यांची भेट घेतली व मंत्रिमंडळात दिगंबर कामत यांचा समावेश करावा, अशी मागणी केली. दिगंबर कामत व इतर सात जणांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यातील केवळ आलेक्स सिक्वेरा यांनाच मंत्रिपद मिळाले. काही आमदारांची महामंडळावर वर्णी लागली. दिगंबर कामत यांना अद्याप मंत्रिपद मिळाले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असल्याची माहिती यावेळी तानावडे यांना देण्यात आली.

Digambar Kamat News
Digambar Kamat: '..तर युवकसुद्धा कृषी क्षेत्राकडे आकर्षित होतील'! आमदार कामत यांनी शेतकऱ्यांच्या भूमिकेबद्दल मांडले मत

आठ आमदारांनी जेव्हा भाजपामध्ये प्रवेश केला, तेव्हा त्यांना केंद्रातील नेत्यांनी कोणते आश्वासन दिले होते, याची कल्पना आपल्याला नाही कारण आपण, त्यावेळी त्यांच्या सोबतच्या बैठकीला उपस्थित नव्हतो. जर आपण उपस्थित असतो आणि आपल्या समक्ष जर आश्वासन दिले असते तर आपण त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केला असता, असे तानावडे यांनी या कार्यकर्त्यांना सांगितले.

सासष्टीतील आठ पैकी मडगाव मतदारसंघात नक्कीच पुन्हा भाजपचा उमेदवार निवडून येईल. तसेच शेजारील फातोर्डा मतदारसंघातही भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकतो आणि यापूर्वी ते सिद्ध झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com