Goa ESI Hosptial Dainik Gomantak
गोवा

Margao News: धक्कादायक! बोटाच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू; कोर्टाने दिले चौकशीचे आदेश

Margao ESI Hospital Death Case: मडगावच्‍या ईएसआय इस्‍पितळात हाताच्‍या बोटाची शस्‍त्रक्रिया करताना सुनयना सुमो देसाई (५०,रा. सावर्डे) या महिलेच्‍या संशयास्‍पद मृत्‍यूप्रकरणी मडगाव पोलिसांनी एफआयआर दाखल करून चौकशी करावी, असा आदेश मडगावच्‍या प्रथम वर्ग न्‍याय दंडाधिकारी साबिनो ब्रागांझा यांनी दिला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Police to Investigate Suspicious Death at Margao ESIC Hospital

मडगाव: मडगावच्‍या ईएसआय इस्‍पितळात हाताच्‍या बोटाची शस्‍त्रक्रिया करताना सुनयना सुमो देसाई (५०,रा. सावर्डे) या महिलेच्‍या संशयास्‍पद मृत्‍यूप्रकरणी मडगाव पोलिसांनी एफआयआर दाखल करून चौकशी करावी, असा आदेश मडगावच्‍या प्रथम वर्ग न्‍याय दंडाधिकारी साबिनो ब्रागांझा यांनी दिला आहे.

१५ फेब्रुवारी २०२३ रोजी मडगावच्‍या ‘ईएसआय’ इस्‍पितळात सदर प्रकरण घडले होते. डाव्‍या हाताच्‍या अंगठ्याला संवेदना नसल्‍याने सुनयना देसाई हिला शस्‍त्रक्रिया करण्‍यासाठी या इस्‍पितळात भरती करण्‍यात आले होते. या महिलेला ऑपरेशन थिएटरमध्ये सकाळी ९.३० वाजता नेले असता संध्याकाळी ५.३० वाजता तिचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्या दिवशी तिची तब्येत उत्तम असताना ऑपरेशननंतर तिचा मृत्यू संशयास्पद आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप करून नातेवाईकांनी मडगाव पोलिसांत तक्रार केली होती.

या प्रकरणी गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय डॉक्टरांनी शवचिकित्सा केली होती. तरीही मडगाव पोलिसांकडून या प्रकरणी एफआयआर नोंदवून चौकशी करण्याची विनंती सुनयना हिचे भावोजी सूरज सावंत यांनी मडगावच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्याकडे याचिका दाखल केली होती.

याचिका निकाली काढण्याचे निर्देश

याचिकादारातर्फे ॲड. रोहन देसाई आणि ॲड. प्रितेश माजाळीकर यांनी, तर सरकारतर्फे वकील एस. नागवेकर यांनी युक्तिवाद केला. तसेच या प्रकरणाची माहिती उच्च न्यायालयाला देऊन सदर याचिका निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT