Margao Jobs  Gomantak Digital Team
गोवा

Margao News : गोमंतकीयांच्या नोकऱ्यांसाठी कोकणी संस्‍था काय करतात?

कोकणी परिषदेकडून ठराव : कोकणी भाषा मंडळाकडून अर्ज सादर

dainik gomantak team

Margao News : गोव्‍यातील नोकऱ्या स्थानिक युवकांनाच मिळाव्‍यात, यासाठी कोकणी भाषेची सक्‍ती करावी, अशी मागणी वाढत असताना केंद्राच्‍या गोव्‍यातील नोकऱ्यांनाही हेच तत्त्व का लागू नये, असा प्रश्‍न आता लोक करू लागले आहेत. त्यासाठी कोकणी संस्‍थांनी काही प्रयत्‍न केले आहेत का? की त्‍या मूग गिळून गप्‍प आहेत? केंद्राच्‍या राज्यातील 126 पैकी फक्‍त दोनच नोकऱ्या गोमंतकीय युवकांना मिळाल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गोव्‍यातील युवकांचे हितरक्षण करायचे असल्‍यास एक खंबीर दबाव गट का निर्माण होऊ शकत नाही, असाही प्रश्‍न लोक विचारत आहेत.

‘गोवा कॅन’ संघटनेचे निमंत्रक रोलंड मार्टिन्‍स म्‍हणाले की, सासष्‍टीच्‍या किनारी भागातील टपाल कार्यालयात औषधालाही गोमंतकीय कर्मचारी सापडत नाहीत. त्यामुळे स्‍थानिकांना त्रास सहन करावा लागतो. टपाल खात्‍याच्‍या नोकऱ्यांसाठी जी परीक्षा घेतली जाते, ती कोकणी भाषेतून घेतली असती तर ही परिस्‍थिती आलीच नसती. वास्‍तविक गोव्‍यात ही कोकणी राजभाषा आहे. मात्र तिचा व्‍यवहारात कुणीही वापर करत नाही. यामुळे अशा परीक्षांमध्‍ये कोकणी ही अनुसूचित भाषा असूनही तिचा वापर केला जात नाही.

यासंदर्भात कोकणी भाषा मंडळाच्‍या अध्‍यक्ष अन्‍वेषा सिंगबाळ म्हणाल्या, केंद्राच्‍या गोव्‍यातील नोकर भरतीतही कोकणीची अट असावी, यासाठी आम्‍ही सरकारकडे वारंवार मागणी केली आहे. मुख्‍य टपाल संचालकांनाही यापूर्वी निवेदनही दिले होते. गोवा लोकसेवा आयोगातर्फे ज्‍या परीक्षा घेतल्‍या जातात, त्‍यात अंतिम यादीतील उमेदवारांना कोकणी भाषेच्‍या तज्ज्ञांकडून तोंडी परीक्षेला सामोरे जावे लागते. केंद्राच्‍या गाेव्‍यातील नोकऱ्यांसाठीही हेच तत्त्व आचरणात आणावे.

अखिल भारतीय कोकणी परिषदेचे कार्यकारी अध्‍यक्ष चेतन आचार्य म्हणाले, या परीक्षा कोकणीतून घ्‍याव्‍यात असा ठराव घेऊन तो सरकारला पाठवला आहे. मात्र, अन्‍य कुठलेही निवेदन पाठविलेले नाही. कोकणी अकादमीचे अध्‍यक्ष अरुण साखरदांडे म्हणाले, हल्‍लीच्‍या तीन वर्षांत अकादमीने सरकारकडे अशी कोणतीही मागणी केलेली नाही. त्‍यापूर्वी केली असेल तर त्‍याची मला माहिती नाही. कोकणी अकादमी ही मुख्‍यत: कोकणी साहित्‍य व संस्‍कृतीला पाठिंबा देण्‍यासाठी स्‍थापन केली आहे. नोकर भरतीसाठी कोकणी परीक्षा घेण्‍यासाठीची कुठलीही यंत्रणा अकादमीकडे उपलब्‍ध नाही, हे त्‍यांनी मान्‍य केले.

कोकणी राजभाषा संचालनालयाचे संचालक राजू गावस म्हणाले, हल्‍लीच्‍या काळात तरी संचालनालयाकडून केंद्रीय नोकऱ्यांसाठी कोकणी परीक्षा घाव्‍यात, अशी मागणी केलेली नाही, असे त्‍यांनी सांगितले.

आता ग्रामसभा करणार मागणी

टपाल खात्‍याचा संबंध थेट स्‍थानिक लाेकांशी येत असल्‍याने राज्यातील टपाल खात्‍याच्‍या नोकर भरतीत कोकणीची अट सक्‍तीची करावी, यासाठी ग्रामसभा ठराव घेणार असल्‍याचे रोलंड मार्टिन्‍स यांनी सांगितले. असे ठराव घ्‍यावेत, यासाठी आमची संघटना जागृती करणार असून हे ठराव नंतर केंद्र सरकारला पाठविणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

दैनंदिन व्‍यवहारात राजभाषेचा वापर जास्‍तीत जास्‍त व्‍हावा, यासाठी कोकणी भाषा मंडळासारख्‍या संस्‍थेने पुढाकार घेण्‍याची गरज आहे. सरकारी खात्यांतील वेगवेगळ्‍या प्रकारचे छापील अर्ज कोकणीतून उपलब्‍ध झाले पाहिजेत.

- रोलंड मार्टिन्‍स, निमंत्रक, गोवा कॅन.

गोव्‍यातील केंद्रीय नोकऱ्या गोमंतकीयांनाच मिळण्‍यासाठी कोकणी भाषेची अट आवश्‍‍यक आहे. ही अट मान्‍य करण्‍यासाठी सरकारवर दबाव आणण्‍यासाठी खंबीर असा दबाव गट कार्यरत असायला हवा होता. दुर्दैवाने तो नाही. वास्‍तविक यासाठी काेकणी भाषा मंडळ, कोकणी परिषदेसारख्‍या संस्‍थांनी पुढाकार घेण्‍याची गरज हाेती. दबाव गट असल्‍याशिवाय गोमंतकीयांवरील अन्‍याय दूर होणार नाही.

दामोदर घाणेकर, कोकणी राजभाषा आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT